तुम्ही 15 ऑगस्ट साठी मराठी चारोळ्या (15 August Charolya Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन रोजी जबरदस्त मराठी चारोळ्या सांगितल्या आहेत. तर जाणून घेऊया
15 ऑगस्ट साठी मराठी चारोळ्या – 15 August Charolya Marathi

उत्सव तीन रंगांचा ,
आभाळी आज सजला ….
नतमस्तक मी त्या सर्वांचा ,
ज्यांनी भारत देश घडवला ….
भारतीय इतिहासात ,
तो दिवस अमर झाला ,
१५ ऑगस्टला ,
आमुचा भारत स्वतंत्र झाला ….
तिरंगा झेंडा फडकतो ….
सारे जयजयकार बोला !
१५ ऑगस्ट अभिमानाचा ….
आपला भारत स्वतंत्र झाला !
तिरंगा आमुचा झेंडा ….
उंच-उंच फडकवू !
प्राणपणाने लढून आम्ही ….
शान याची वाढवू !
तीन रंगांचा शोभतो तिरंगा ,
केशरी, पांढरा, अन हिरवा ….
अभिमानाने फडकत गातो ,
वीरांच्या शौर्याची गाथा ….
डौलाने फडकतो तिरंगा ….
मनामनास देती स्फूर्ती !
अवघ्या विश्वात गाजत राही ….
प्रिय भारत भू ची कीर्ती !
विविधतेत एकता ,
आहे आमची शान ,
म्हणूनच आहे माझा ,
भारत देश महान ….
तिरंगा आमुचा मान …..
पराक्रमाचे गान !
भारताची शान ….
तिरंगा आमुचा प्राण !
स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो ,
सूर्य तळपतो प्रगतीचा ,
भारत भू च्या पराक्रमाला ,
आमुचा मानाचा मुजरा ….
Read More :-
- 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
- 15 अगस्त, स्वतंत्रता दिवस पर कविताएं
- 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन निबंध मराठी
15 ऑगस्ट साठी मराठी चारोळ्या (15 August Shayari in Marathi) हा संग्रह तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरला, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.