तुम्ही स्वातंत्र्य दिन मराठी भाषण (15 August Speech in Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट भाषण मराठी pdf सांगितल्या आहेत. तर जाणून घेऊया
1) 15 ऑगस्ट साठी फक्त ५ ओळींचे सुंदर व छोटे भाषण मराठी
- सर्वांना नमस्कार.
- माझे नाव …….. आहे आणि मी इयत्ता ….त शिकते.
- आज १५ ऑगस्ट, आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन आहे.
- आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला.
- आज आपण सर्वांनी भारताला स्वतंत्र करणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांना सलाम करुया आणि देशाचा अभिमान बाळगूया.
तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
जय हिंद, जय भारत !
Read More :-
2) 15 ऑगस्ट मराठी भाषण शायरी – 15 August Shayari Bhashan Marathi

“ज्याचा मुकूट आहे हिमालय,
जिथे वाहते गंगा…
जिथे आहे विविधतेत एकता,
सत्यमेव जयते आहे आमचा नारा ….
जिथे धर्म आहे भाईचारा
तोच आहे भारतदेश आमचा….!”
सर्वांना नमस्कार !
- माझे नाव …….. आहे.
- आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
- तर सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !
- १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. तसेच भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.
- १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
- आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे.
- त्या सर्व शुर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.
- या दिवशी देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवितात व तसेच राष्ट्रध्वजास २१ तोफांची सलामी दिण्यात येते.
- तसेच या दिवशी सर्व शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, ध्वजवंदन व देशभक्ती वर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे, आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते :-
तिरंगा आमुचा ध्वज,
उंच उंच फडकवू….
प्राणपणाने लढून आम्ही,
शान याची वाढवू….
बोला – भारत माता की जय !
वंदे मातरम् ! वंदे मातरम् !
Read More :-
3) 15 ऑगस्ट मराठी भाषण – 15 August Speech in Marathi for Child
विसरू नका अशा वीरांना,
ज्यांनी देशासाठी दिले प्राण ….
तिरंगा आहे आपली शान,
आणि सैनिकच राखतात त्याची जान…!
सर्वांना माझा नमस्कार…..
मी सचिन…
सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवानी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज १५ ऑगस्ट ! म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम्.
१५ ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. व मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. चला आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटे…..
स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम्,
त्यांच्या निस्वार्थ त्यागनिच,
भारत बनला महान…..
तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!
जय हिंद ! जय भारत !
धन्यवाद !!
Read This :- नागपंचमी निबंध मराठी
4) 15 ऑगस्ट भाषण मराठी – 15 August Speech in Marathi : 2023

“माझ्या देशाची किर्ती महान
नका समजू कुणी लहान
साऱ्या दुनियेत फैडकत राही
माझा तिरंगा प्यारा”
आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन ! आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले.
आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगत सिंग, राजगुरु, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढयात अमूल्य योगदान दिले.
त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे.
आपल्या देशाला थोर महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहेत. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्या पासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे.
आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खया अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद ! जय भारत !
Read More :-
5) स्वतंत्रता दिवस पर भाषण 2023 मराठी – Independence Day Speech in Marathi
तिरंग्याचे तीन रंग ….
खूप काही सांगून जातात ,
भारत देशाची खरी ओळख …
आसमंती झळकून जातात !
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणीनों सर्वांना माझा नमस्कार !
आज १५ ऑगस्ट ! म्हणजेच आपण सर्वजन आज इथे भारताचा ७७ वा ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या उत्सवात मग्न झाला आहे. तसेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !
हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. १५ ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन होय.
मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, भगत सिंह, लोकमान्य टिळक अश्या अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
ना जातीसाठी लढले ,
ना धर्मासाठी लढले ….
शूर भारतीय वीर ,
फक्त देशासाठी लढले …..
अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन. आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लालकिल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवितात. हा सण मोठ्या उत्साहात शाळा व महाविदयालयात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात, व सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात.
आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया व अशा या भारत देशाचा मला अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळवून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू. शेवटी मी येवढेच म्हणेन….
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा ,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा …
जयघोष भारताचा आसंमती गुंजावा ,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा …!
बोला – भारत माता की जय !
जय हिंद ! जय भारत !
6) स्वातंत्र्य दिन भाषण मराठी – 15 Aug Bhashan Marathi

“उत्सव तीन रंगांचा….
आभाळी आज सजला !
नतमस्तक मी त्या सर्वांचा….
ज्यांनी भारत देश घडवला !!”
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनों सर्वांना माझा नमस्कार !
आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन आज इथे भारताचा ७७ वा ‘स्वातंत्र्य दिन‘ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !
मित्रांनी, १५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले.
महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई सरदार बल्लभभाई पटेल, मंगल पांडे अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले.
आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन ….
आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवितात. हा सण मोठ्या उत्साहात शाळा व महाविद्यालयात साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मिरवणुका काढल्या जातात. घोषणा दिल्या जातात. सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात.
स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत. त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे.
चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवूया. शेवटी मी एक छोटीशी कविता बोलून माझे भाषण संपवते :-
तिरंगा आमुचा भारतीय झेंडा….
उंच-उंच फडकवू !
प्राणपणाने लढून आम्ही….
शान याची वाढवू !!
जय हिंद ! जय भारत !!
स्वातंत्र्यदिनाचे मराठी भाषण (15 August Speech in Marathi with Shayari 2023) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण तुमच्या मित्रांनाही शेअर करा.