क्या आप गणतंत्र दिवस मराठी भाषण (26 January Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो यह पोस्ट आपके लिए एकदम सही है. आज मैंने आपको 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण बताया है जिसे कि आप कंपटीशन में बोल सकते हैं. तो आइए सबसे पहले कुछ जरूरी पॉइंट पढ़ते हैं :-
राष्ट्रीय सण | प्रजासत्ताक दिन |
साजरा केला जातो | दरवर्षी 26 जानेवारीला |
2023 मध्ये आहे | ७४ वा प्रजासत्ताक दिन |
प्रथमच साजरा केला | 26 जानेवारी 1950 रोजी |
2023 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे | इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी |
(1) 26 जानेवारी सोपे लहान मराठी भाषण – 26 January Short Marathi Speech
- सर्वांना नमस्कार….
- माझे नाव सचिन आहे.
- आज २६ जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत.
- सर्वप्रथम, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे.
- २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अंमलात आले.
- भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत हक्क व अधिकार दिले आहेता.
- प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत.
- हा दिवस आपल्याला एकता, शांतता व अखंडतेची शिकवण देतो. आपण सर्वांनी देशहितासाठी कार्य केले पाहिजे.
(2) गणतंत्र दिवस मराठी भाषण – Republic Day Speech in Marathi

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला…
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी भारत देश घडवला…
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवानो,
आज २६ जानेवारी! आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन! यानिमित्त प्रथम तुम्हां सर्वांना ‘भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !’
मित्र हो, २६ जानेवारी हा आपला एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद-उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा राज्यकारभार २६ जानेवारी १९५० सुरळीतपणे सुरू झाला.
या दिवशी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच देशाच्या संविधान सभेने २ वर्षे, ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेवून भारताचे समृध्द संविधान तयार केलें. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
भारतीय संविधानाने आपल्याला कोणत्याही भेदभावाशिवाय समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. हे संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्त्वांवर आधारीत आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतर खरी लोकशाही नांदू लागली.
आपल्या भारताला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक थोर क्रांतीकारकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. आज त्या सर्व शूर वीरांना आपण सलाम करूया. त्याच्यांमुळे आज आपण भारतात मुक्त श्वास घेत आहोत.
धन्य धन्य ते भारतीय संविधान !
धन्य धन्य ते महान परमपूज्य,
भारतीय संविधानाचे शिल्पकार…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ।
धन्य धन्य ते शूर भारतीय देशभक्तं,
क्रांतीकारक आणि वीर जवान…!
तुम्हा सर्वांना आज प्रजासत्ताक दिनी माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद !
बोला – भारत माता की जय !
वंदे मातरम !
Read More :-
- 26 जनवरी पर मराठी निबंध
- सुभाष चंद्र बोस मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण
- सुभाष चंद्र बोस मराठी निबंध
(3) 26 जानेवारी भाषण मराठी 2023 – 26 January Speech in Marathi

उत्सव तीन रंगाचा….
आभाळी आज सजला….
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी….
ज्यांनी भारत देश घडवला !!
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय देशबांधवांनी…. सर्वांना माझां नमस्कार !
सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीरांना, महापुरुषांना मी वंदन करते….
आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे.
मित्र हो, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण स्वातंत्र्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. देशात सर्वांना शांततेने व समाधानाने जगता यवि म्हणून डाँ बाबासाहब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने संविधान तयार केले.
२६ जानेवारी १९५० रोजी संविधान अमलात आले. या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. त्यानुसार सर्वांना समान हक्क-अधिकार मिळालेले अहित.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही त्या शूर वीरांना आपण वंदन करूया !
आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सन्मान करुया !
हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात केला जातो. भारत देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. तर चला आज आपण एक संकल्प करू की, आपण सर्व भारतीय देशाची एकता, अखंडता टिकवून ठेवू व देशहितकारक काम करु…
तिरंग्याचे तीन रंग….
खूप काही सांगून जातात….
भारत देशाची खरी ओळख….
आसमंती झळकून जातात…!
जय हिंद !!!!
FAQ’s – पोस्ट से सम्बंधित महत्वपूर्ण प्रश्न
प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो ?
प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो
भारताची राज्यघटना केव्हा लागू झाली ?
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली
संक्षेप में
26 जनवरी, गणतंत्र दिवस मराठी भाषण (26 January Speech in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट में हमें जरूर बताएं और इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा !