तुम्ही अण्णाभाऊ साठे भाषण मराठी (Annabhau Sathe Speech in Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती भाषण सांगितले आहे. तर जाणून घेऊया
1) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ५ सोप्या व सुंदर ओळी भाषण
सर्वांना नमस्कार !
माझे नाव …… आहे. आणि मी इयत्ता …… त शिकतो.
- आज १ ऑगस्ट! तर मी आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी दोन शब्द बोलणार आहे. व सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा !
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक, लेखक, लोककवी व कांदबरीकार होते.
- त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई होते.
- त्यांनी छ. शिवरायांचे चरित्र पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले व त्या पोवाड्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले व रशियाच्या राष्ट्रध्यक्षाकडून त्यांचा सन्मान झाला.
- त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावणी यांची निर्मिती केली. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला राज्यसरकार कडून सर्वोकृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांची ‘माझी मैना गावावर राहिली’ ही लावणी अविस्मरणीय आहे. अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी १८ जुलै १९६९ रोजी या जगाचा निरोप घेतला.
या थोर समाजसुधारकास माझे कोटी-कोटी प्रणाम् !
धन्यवाद !!
Read More :-
2) अण्णाभाऊ साठे भाषण मराठी – 1 August, Annabhau Sathe Speech in Marathi

“समाजात जगण्यासाठी,
दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान….
साहित्य आणि लोककलेतून केला,
जनमनाचे पुनर्निर्माण….”
अध्यक्ष महाक्षय, पुज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणीन सर्वांना माझा नमस्कार !
आज १ ऑगस्ट ! तर सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा ! अण्णाभाऊ साठे, हे एक थोर समाजसुधारक, लेखक, लोककवी आणि कांदबरीकार होते. त्यांनी आपले विचार, कार्य व प्रतिमायातुन लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते.
गरीबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. ते केवळ दीड दिवस शाळेत गेले होते, तरी देखील त्यांनी अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले. ते वडिलांबरोबर मुंबईत आले. तिथे त्यांनी मिळेल ते काम केले. जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत.
“नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की तलवार पुन्हा धारधार बनते”
अशी त्यांची विचार सरणी होती. शाळा न शिकताही त्यांनी चित्रपट, पोवाडे, लावण्या, गवळण, प्रवास, लोकनाय्य, कांदबरी असे सर्वच प्रकार सशक्त आणि समृद्ध केले.
त्यांनी छ. शिवरायांचे चरित्र पोवाड्यातून रशियापर्यंत पोहोचवले व त्या पोवाड्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले व रशियाच्या राष्ट्रध्यक्षाकडून त्यांचा सन्मान झाला. त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणून त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.
त्यांनी २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कांदबऱ्या लिहिल्या व त्यांची ‘माझी मैना गावा- कडे राहिली’ ही गाजलेली लावणी होती. तसेच त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला राज्यसरकार कडून सर्वोकृष्ट कांदबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली. गोवा मुक्ती संग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
अशा या थोर शिवशाहीर, भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले. अश्या, या अण्णाभाऊ बद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे. तर या महान लोकशाहीरास शतशः प्रणाम्
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय भारत !
धन्यवाद !!
अण्णाभाऊ साठे भाषण मराठी (1 August Annabhau Sathe Bhashan) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण तुमच्या मित्रांनाही शेअर करा.