क्या आप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण (Dr. Babasaheb Ambedkar Speech In Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं
इस पोस्ट में मैंने आपको डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूप सोपे व सुंदर भाषण बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर खूप सोपे व सुंदर भाषण 10 ओळी
- सर्वांना नमस्कार.
- माझे नाव दिक्षा आहे.
- आज मी आपणासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
- त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बील अशी अनेक सामाजिक कार्ये केली.
- त्यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा संदेश दिला.
- दुर्देवाने, ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.
- त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात.
अशा या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद !
जय हिंद, जय भारत, जय भीम !!
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण – Dr. Babasaheb Ambedkar Speech In Marathi

आले किती गेले किती,
उडून गेले भरारा….
संपला नाही अन संपणारही नाही,
माझ्या भीमाचा दरारा….
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार !
आज मी आपणासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भिमाबाई असे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते.
शालेय शिक्षण घेत असताना त्यांना ‘अस्पृश्य’ म्हणून खूप त्रास सहन करावा लागला ; पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी अस्पृश्य, दीन-दलित समाजाचा उध्दार करण्याचे ठरवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बड़ोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण हे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणले. आपल्या बांधवाना त्यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश दिला.
त्यांनी दीन-दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने आणि सत्याग्रहे केली. त्यांनी सामाजिक भेदभाव करणाऱ्या ‘मनुस्मृती’ ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिर दीनदलितांसाठी खुले केले. महाडच्या चवदार तळयाचाहीँ सत्याग्रह केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट वाचक व लेखक होते. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व समता यासारखी वृत्तपत्र सुरू करून समाजप्रबोधन केले. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचे कार्य कोणालाही शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतके प्रचंड आहे.
असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा धनी, ज्ञानतपस्वी, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडदयाआड गेले.
या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद !
जय हिंद, जय भारत, जय भीम !!
FAQ’s – सतत विचारले जाणारे प्रश्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.
ज्याला संविधानाचा निर्माता म्हणतात ?
डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते.
Read More :-
- सुभाषचंद्र बोस मराठी भाषण
- राजर्षी शाहू महाराज सुंदर मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण
- छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण (Dr. Babasaheb Ambedkar Speech In Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा