क्या आप गुरुपौर्णिमा मराठी भाषण (Guru Purnima Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको गुरुपौर्णिमा शुभेच्छा भाषण बताया है. तो आइए जानते हैं
1) गुरुपौर्णिमा 5 ओळी भाषण – Guru Purnima Marathi Bhashan
“गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णू
गुरुदेवो महेश्वरा:
गुरुसाक्षात परब्रम्ह
तस्मै श्रीगुरवे नमः”
सर्वांना नमस्कार ….!
- आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण गुरूपौर्णिमा म्हणून मोठया आनंदाने साजरा करीत आहो त, तर सर्वप्रथम गुरूपौर्णिमेच्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा…
- गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी आदिगुरु महर्षि व्यासांचा जन्म झाला होता.
- हा दिवस गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे.
- गुरू हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरू होय.
- आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा, गुरूंचे महत्व हे शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे.
माझ्या सर्व गुरुंना खूप-खूप धन्यवाद, आणि गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद !!
2) गुरुपौर्णिमा भाषण मराठी – Guru Purnima Bhashan in Marathi
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू,
गुरुर्देवो महेश्वर…
गुरुसाक्षात परब्रम्ह,
तस्मै श्रीगुरवे नम…
आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजन वर्ग, पालक वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र – मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.
आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. हा दिवस आपण गुरूपौर्णिमा म्हणून मोठया आनंदाने साजरा करीत आहोत. यानिमित्त सर्वांना ‘गुरूपौर्णिमेच्या’ हार्दिक शुभेच्छा !
गुरुपौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा असेही म्हणतो. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता.
भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अतिउच्च आहे. गुरू हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात. गुरू हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. ते समाजाला ज्ञान देण्याचे कार्य करतात.
कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो ; त्याप्रमाणे गुरू मानवरुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात.
गुरूंचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते. आपले प्रथम गुरू आई-वडील असतात. यानंतर आपले गुरु शिक्षक असतात. ते आपल्याला नवनवीन ज्ञान देतात. आपला सर्वांगीण विकास करतात.
आपल्याला चांगल काय आणि वाईट काय हे समजावून देतात. आपल्याला जीवनात कसे यश मिळवावे हे शिकवतात. कोणत्याही कठीण प्रसंगी धैर्याने परिस्थितीचा सामना कसा करावा हे शिकवतात.
गुरू आपले मार्गदर्शक असतात. आपण नेहमी त्यांचा आदर करावा. चांगला अभ्यास करून, चांगले कार्य करून आपल्या आई-वडिलांचा, गुरूंचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवावा.
काळोखाची रात्र जरी असली,
तरी साथ कंदिलाची मिळावी ….
देव्हा-यातील वात सदैव,
तेवत रहावी …
माझ्या साऱ्या गुरूंना,
दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी….
धन्यवाद !
जय हिन्द ! जय भारत !
Read More :-
3) गुरुपौर्णिमा मराठी भाषण – Guru Purnima Speech in Marathi

गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे…
मोल आयुष्याचे जाणून घ्यावे !
गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे…
चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे !
गुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरूजनांना माझा प्रणाम !
ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे ‘गुरुपौर्णिमा’. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अतिउच्च आहे. आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती अशाप्रकारे गायली आहे….
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा !
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम :
अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु होय.
कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो; त्याचप्रमाणे गुरु मानवरुपी व्यक्तिमत्वाला आपल्या आदर्श संस्कारांनी आदर्श घडवतात.
आता काळ बदललेला आहे. शिक्षण पध्दती बदलली आहे. परंतु गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र पवित्र आहे.
गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री, सरस्वतीची अमृतवाणी, सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार.
आपण आपल्या गुरुंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा.
गुरुशिवाय ज्ञान नाही…
ज्ञानाशिवाय आत्मा नाही !
ध्यान, ज्ञान, धैर्य, कर्म…
सर्वकाही गुरूंचीच देन आहे.
माझ्या सर्व गुरूंना खूप-खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
गुरुपौर्णिमा मराठी भाषण (Guru Purnima Speech in Marathi 2023) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.