क्या आप होळी निबंध मराठी (Holi Essay in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको होळी माहिती बताई है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
होळी निबंध मराठी – Holi Essay in Marathi

होळी हा भारतातील सर्वांचा आवडता सण आहे. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीला शिमगा असेही म्हणतात.
या सणाची सुरुवात होळी दहनाने होते. असे मानले जाते की, याच दिवशी भगवान विष्णू यांनी आपला भक्त प्रल्हाद याची राक्षस राजा हिरण्यकश्यप व त्याची बहिण होलिका यांच्या कूटनीतीतून सुटका केली होती. तेव्हापासून वाईटावर चांगलेपणाचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते.
या दिवशी लोक लाकडे, काटक्या, गोवऱ्या इ. गोळा करून सामूहिकपुणे होळी रचतात. रात्री होळी पेटवून होळीला नारळ अर्पण करून पुरण-पोळीच नैवेदय दाखवतात. पेटलेल्या होळीभोवती होळी-रे-होळी, पुरणाची पोळी म्हणत प्रदक्षिणा घालतात.
होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलवड किंवा धूलिवंदन असे म्हणतात. या दिवशी लोक खूप आनंदात असतात. एकमेकांना रंग-गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देतात. लहान मुले एकमेकांवर पिचकारीने रंग उडवतात. त्यामुळे या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात.
यादिवशी सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे होळी हा सण मला खूप आवडतो वाईटाचा नाश करणे व चांगल्याचा स्वीकार करणे हाच होळीचा खरा संदेश आहे.
Read More :-
होळी सोपा निबंध मराठी (Holi Essay in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये निबंध अच्छा लगा तो इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा