तुम्ही लोकमान्य टिळक मराठी भाषण (Lokmanya Tilak Speech in Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला लोकमान्य टिळकांचे १० ओळींचे मराठी भाषण सांगितले आहे. तर जाणून घेऊया
1) लोकमान्य टिळक भाषण मराठी – Lokmanya Tilak Speech in Marathi

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,
आणि तो मी मिळवणारच….
अशी सिंह गर्जना दिली !
भारतीय जनतेत स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा निर्माण केली.. !
सर्वांना नमस्कार !
माझे नाव ______ आहे.
- आज २३ जुलै ! तर मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढयातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे.
- सर्वप्रथम सर्वांना लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा !
- लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला
- त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते.
- १८७७ साली टिळकांनी डेक्कन महाविदयालयातून बी.ए. ची पदवी प्राप्त केली.
- “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करून स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले.
- त्यांनी १८८० मध्ये ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली
- तसेच त्यांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी ‘गणेशोत्सव’ व ‘शिवजयंती’ उत्सव सुरू केले. त्यांच्या या कार्यामुळे ते ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
- स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहला.
- अखेर, १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक या महान महापुरुषाने अखेरचा श्वास घेतला.
अशा थोर नेत्यास माझे कोटी-कोटी प्रणाम !
Read More :-
- स्वातंत्र्य दिन सोपे व सुंदर भाषण मराठी
- अण्णाभाऊ साठे जयंती मराठी भाषण
- स्वातंत्र्य दिन निबंध मराठी
- सेवानिवृत्ती निरोप समारंभ मराठी भाषण
2) लोकमान्य टिळक जयंती सोपे मराठी भाषण – Lokmanya Tilak Jayanti Bhashan 2023
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण इथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत.
सर्वप्रथम मी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरूवात करतो.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असे ठामपणे सांगणारा, स्वराज्यासाठी निर्भिडपणे लढणारा व्यक्ति म्हणजे लोकमान्य टिळक.
लोकमान्य ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली. त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक पण सर्वजण त्यांना प्रेमाने बाळ गंगाधर टिळक म्हणत. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी येथे झाला.
त्यांच्यात आत्मविश्वास, निर्भयता हे गुण लहानपणापासूनच होते. त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला. समाजात परिवर्तन घडवून आणले. जनतेला जागृत करण्यासाठी शिवाजी उत्सव, गणेशोत्सव सारखे सार्वजनिक उत्सव साजरे केले. त्यांना आधुनिक भारताचे निर्माते सुद्धा म्हटले जाते.
अशा या महापुरुषाची जयंती साजरी करण्याची संधी आपल्याला भेटली. आपण सर्वांनी या संधीचं सोनं करून सर्वसामान्यांपर्यंत टिळकांचे विचार पोहचवायला पाहिजे.
धन्यवाद !
लोकमान्य टिळकांचे मराठी भाषण (Lokmanya Tilak Speech in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण तुमच्या मित्रांनाही शेअर करा.