क्या आप महाशिवरात्रि मराठी निबंध (Mahashivratri Essay in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको महाशिवरात्रि माहिती बताई है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
महाशिवरात्रि मराठी निबंध – Mahashivratri Essay in Marathi

महाशिवरात्री हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे जो माघ चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्री या शब्दाचा अर्थ शिवची महान रात्र असा होतो.
याच दिवशी भगवान शिवशंकर यांनी दिवी पार्वती यांच्याशी विवाह केल्याची अख्यायिका आहे. हा सण दर वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते.
या दिवशी हिंदू बांधव उपवास करतात, व सकाळी लवकर उठून भाविक मंदिरात पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, दही, शेन, गोमूत्र लावून शिवलिंगाला अभिषेक करतात.
महाशिवरात्रीला बेलाच पान, धोत्रा फूल व पांढरी फुले यांना विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.
असे म्हंटले जाते की समुद्र मंथनाच्याविळी विष निर्माण झाले होते. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची ताकद फक्त भगवान शिव यांच्यात होती.
त्यामुळे विश्वाला या विषाच्या प्रभावापासून वाचविन्यासाठी शंकर भगवान ने हे विष प्राशन केले. हे विष त्यांनी आपल्या कंठात ठेवले म्हणून शंकर भगवान यांना निळकंठ असे म्हणतात.
भारतात विविध भागात महाशिवरात्री उत्सव विविध पद्धतीने साजरा होतो. “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा जप केला जातो, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्याने जीवनातील दुःख व समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे.
Read More :-
महाशिवरात्रि मराठी निबंध (Essay on Mahashivratri in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये निबंध अच्छा लगा तो इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा