Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi :- आपल्या भारत देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते आणि त्यांचा जन्मदिवस भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
तुम्ही गांधी जयंतीचे भाषण शोधत आहात का मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मी तुम्हाला महात्मा गांधींवरचे भाषण सांगितले आहे. त्यामुळे वेळ न घालवता वाचूया.
1) महात्मा गांधी जयंती भाषण मराठी – Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi

सत्य आणि अहिंसेचे धडे,
दिले साऱ्या जगाला ….
कोटी कोटी वंदन करतो,
बापू आम्ही तुम्हांला ….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.
आज २ ऑक्टोंबर, आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी करीत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना ‘गांधी जयंतीच्या’ खूप खूप शुभेच्छा ! महात्मा गांधीजी हे आपल्या भारताचे एक थोर स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.
महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी इंग्रजांविरुध्द अनेक आंदोलने केली. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह ही त्यांची महत्त्वाची आंदोलने होती. त्यांनी चले जाव, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना जेरीस आणले.
महात्मा गांधीजींची राहणी साधी आणि विचार उच्च होते. लोक त्यांना प्रेमाने बापू तसेच राष्ट्रपिता म्हणत. त्यांनी जातीभेद न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले. त्यांनी जगाला अहिंसेची शिकवण दिल्याने त्यांचा जन्मदिन जगभर ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दुर्देवाने, ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला. अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम ….
धन्यवाद !
जय हिंद, जय भारत….
Read More :- गांधी जयंती पर निबंध हिंदी में
2) महात्मा गांधी भाषण मराठी – Mahatma Gandhi Speech in Marathi
बापू सन्मान करतो आम्ही,
तुमच्या महान नेतृत्वाचा…
भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला,
हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा…
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो….
सर्वांना माझा नमस्कार !
आज मी आपणासमोर भारतमातेचे थोर सुपुत्र, भारताचे राष्ट्रपिता तसेच जगाला सत्य व अहिंसेचा महान संदेश देणारे थोर नेते म्हणजे महात्मा गांधीजी यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे.
तर, सर्वप्रथम सर्वांना ‘महात्मा गांधी जयंती’ च्या हार्दिक शुभेच्छा !
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते.
महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले तिथे ते खूप अभ्यास करून बॅरिस्टर बनले. पुढे भारतमातेची सेवा करण्यासाठी आपल्या मायदेशी परतले.
आपल्या भारत देशाला इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार उपोषण इत्यादी मार्गाचा अवलंब करून इंग्रजांना भारत देश सोडून जाण्यास भाग पाडले.
गांधीजींची साधी राहणी व उच्च विचार सरणी होती. गांधी यांना लोक प्रेमाने ‘बापू’ म्हणत असत. त्यांनी देशवासियांना मानवतेची शिकवण दिली. स्वदेशी वस्तू वापरण्याचे देशाला आवाहन केले. रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली.
दुर्देवाने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली परंतु गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार प्रत्येक भारतीयास सदैव प्रेरणा देत राहील हे मात्र नक्की !
शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा
थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम् !
जय हिंद ! जय भारत !
धन्यवाद !!
Read More :- गाँधी जयंती पर भाषण हिंदी में
महात्मा गांधी जयंती भाषण मराठी (Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण तुमच्या मित्रांनाही शेअर करा.