तुम्ही माझी माती माझा देश निबंध मराठी (Majhi Mati Majha Desh Nibandh Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला ‘माझी माती माझा देश’ जबरदस्त मराठी निबंध आहेत. तर जाणून घेऊया
1) माझी माती माझा देश निबंध – Majhi Mati Majha Desh Nibandh
आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाच्या वीरांप्रती असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी भारत सरकार दवारा ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
हे अभियान देशव्यापी आणि लोकाभिमुख आहे. या अभियानामध्ये पंच प्रण, प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरांना वंदन असे उपक्रम तसेच गाव व शहरी भागात शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक उभारले जाणार आहेत.
९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच महापालिका स्तरावर १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत वीरों को नमन, मिट्टी को नमन, मातीचे दिवे या माती हातात घेऊन पंचप्राण प्रतिज्ञा करायची आहे.
तसेच ७५ देशी वृक्षारोपांची लागवड करीत अमृत वाटिका निर्माण करायची आहे. तसेच राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगान करायचे आहे. “माझी माती माझा देश’ या उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होण्यास मदत होईल. या माध्यमातून देशभक्तीचा ध्येयवाद रुजविला जाईल.
Read More :-
2) माझी माती माझा देश निबंध मराठी – Majhi Mati Majha Desh Nibandh Marathi

आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, समाजसुधारकांनी तसेच अनेक ज्ञात-अज्ञात देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज त्या सर्व शूर वीरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. हे अभियान ९ ऑगस्ट २०२३ ते ३० ऑगस्ट २०२३ अखेर देशात राबवले जाणार आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियान माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात-अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी प्रत्येकाला मिळणार आहे.
या अभियानातंर्गत संपूर्ण देशात एकाच कालावधीत उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये शिला फलक, वसुधा चंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, पंचप्रण, ध्वजारोहण व राष्ट्रगान या पाच उपक्रमातून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती केली जाणार आहे.
माझी माती, माझा देश अभियान सर्व भारतीयांसाठी प्रेरक ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेतल्याने प्रत्येकाला हे अभियान आपले वाटणार आहे.
Read More :-
माझी माती माझा देश निबंध मराठी (Majhi Mati Majha Desh Essay in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.