क्या आप मराठी राजभाषा दिन भाषण (Marathi Rajbhasha Din Speech) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं
इस पोस्ट में मैंने आपको मराठी भाषा दिवस खूप सोपे व सुंदर भाषण बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
1) मराठी भाषा दिन खूप सोपे व सुंदर भाषण 10 ओळी
- सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो….सर्वांना माझा नमस्कार !
- आज २७ फेब्रुवारी! हा दिवस आपण ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करीत आहोत.
- सर्वप्रथम, सर्वांना ‘मराठी भाषा दिनाच्या’ खूप-खूप शुभेच्छा !
- थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते.
- कवी कुसुमाग्रन थोर मराठी लेखक, साहित्यकार, नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते.
- त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
- मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा व अधिकृत राजभाषा आहे.
- मराठी खूप सुंदर भाषा असून अनेक थोर संत, कवी, लेखक इ. नी विपुल लेखन केले आहे.
- आजच्या पिढीनेही मराठी भाषेची सुंदरता समजून घेऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.
जय महाराष्ट्र ! जय मराठी !
2) मराठी राजभाषा दिन भाषण – Marathi Rajbhasha Din Speech

आपली शान मराठी ….
आपला मान मराठी !
जगण्याचा ध्यास मराठी….
महाराष्ट्राचा श्वास मराठी !
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों…
सर्वांना माझा नमस्कार !
सर्वप्रथम सर्वांना ‘मराठी भाषा गौरव’ दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !
मित्रहो, आज २७ फेब्रुवारी हा दिवस आपण ‘मराठी भाषा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस !
कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता इ. चे कुशल लेखन केले.
त्यांचे ‘नटसम्राट’ हे नाटक अजरामर आहे. तसेच ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे. त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे. भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. तसेच मराठी भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे.
मराठी भाषेला संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर इ. अनेक संतानी जिवंत ठेवले. मराठी भाषा किर्तन, भारूड, ओव्या, भजन तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभासंपन्न लेखणीने समृद्ध संपन्न झालेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले. आजच्या पिढीनेही मराठी भाषेचा गोडवा व सुंदरता समजून घ्यावी. मराठी भाषेचा जास्तीत-जास्त उपयोग करून आपण संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून मराठी भाषेला अजरामर बनवूया….
माय मराठी, साद मराठी….
भाषांचा भावार्थ मराठी !
बात मराठी, सात मराठी….
जगण्याला या अर्थ मराठी !
जय हिंद !!
FAQ’s – सतत विचारले जाणारे प्रश्न
मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो ?
27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.
मराठी भाषा दिन का साजरा केला जातो ?
कविवर्य कुसुमाग्रजांच्या योगदानाची आठवण म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
Read More :-
मराठी राजभाषा दिन भाषण (Marathi Rajbhasha Din Speech) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.
अतिशय सुंदर !
धन्यवाद !