तुम्ही नागपंचमी निबंध मराठी (Nag Panchami Nibandh Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला ‘नागपंचमी’ जबरदस्त मराठी निबंध आहेत. तर जाणून घेऊया
1) नागपंचमी १० ओळी मराठी निबंध
- श्रावण महिना हा सणांचा महिना आहे, व नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण आहे.
- हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.
- नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया भक्तिभावाने नागदेवतेची पूजा करतात.
- ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून एकत्र येऊन नागाच्या वारुळाजवळ जावून तिथे पूजा करतात व दूध आणि लाह्यांचा नैवद्य दाखवतात.
- या दिवशी स्त्रिया व मुली झोका, झिम्मा व फुगडी खेळतात तसेच नागपंचमीची गाणी म्हणतात.
- या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात तसेच आपल्या भावाच्या प्रगती- साठी व चांगल्या आरोग्यासाठी उपवास करतात.
- नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. कारण साप शेतामध्ये असलेले उपद्रवी उंदीर व कीटक खातो.
- नागपंचमी चा सण हा नागाबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
- नागपंचमी हा सण संपूर्ण भारतात भक्तीभावाने साजरा केला जाती.
- हा सण आपल्याला भूतदया आणि सहिष्णुतेची अनमोल शिकवण देती.
Read This :- रक्षाबंधन मराठी निबंध
2) नागपंचमी निबंध मराठी – Nag Panchami Nibandh Marathi

श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो. दरवर्षी स्त्रिया आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहतात.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीपात्रातून सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेंव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी शेत नांगरू नये, खण नये, भाज्या चिरू नये इ. संकेत पाळले जातात.
या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया वारुळाला जातात. नागाची पूजा करतात. नागदेवतेला दूध, लाया, खीर, भात इ. नैवेद्य दाखवतात. नागपंचमीची गाणी म्हणतात, खेळ खेळतात. शहरी भागात स्त्रिया नागदेवतेच्या चित्राची पूजा करतात.
साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो शेतीला नुकसान पोहचवणा-या जीवांना खातो. नागपंचमी हा सण नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला भूतदयेची शिकवण देतो.
Read This :- माझी माती माझा देश निबंध मराठी
3) नागपंचमी माहिती / निबंध मराठी – Nag Panchami Essay in Marathi
श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो. दरवर्षी स्त्रिया आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहतात.
नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून वारुळाजवळ जावून नागदेवतेची पूजा करतात. नागदेवतेला दूध, लाल्या आणि पुरणाची दिंड नैवेदय दाखवला जातो.
शहरी भागातील स्त्रिया नागदेवतेच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करतात. नागपंचमी च्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात. या सणाला मुली माहेरी येतात. नागपंचमीला स्त्रिया झोका, झिम्मा, फुगडी खेळतात. तसेच नागपंचमीची गाणी म्हणतात.
नागपंचमी हा सण नागाच्या प्रति प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. नागाला किंवा सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. या दिवशी कोणत्याही प्रकारचे खोदकाम, नांगरणी केली जात नाही.
पर्यावरणातील सापांचे संरक्षण करणे हा या सणाचा हेतू आहे. दिवसें-दिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे. साप निघाला तर त्याला न मारता सर्पमित्राला बोलवून त्याला योग्य ठिकाणी सोडले पाहिजे.
Read This :- अण्णाभाऊ साठे जयंती सुंदर मराठी भाषण
नागपंचमी निबंध मराठी (Nag Panchami Nibandh Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.