क्या आप निरोप समारंभ भाषण मराठी (Nirop Samarambh Bhashan Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं
इस पोस्ट में मैंने आपको कक्षा 10th निरोप समारंभ भाषण (10th send off speech in marathi) बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
1) निरोप समारंभ अतिशय सुंदर भाषण – Send off Speech in Marathi

निरोपाच्या हळव्या क्षणी,
दाटून येती आठवणी….
डोळ्यात साठते पाणी,
मूक होते वाणी….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या हायस्कूलच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज निरोप देण्यासाठी आपणासमोर उभा आहे.
वाटले नाही कधी मला,
निरोप आपला घ्यावा लागेल….
पंखात भरलेल्या विचारबळाने,
भरारीला सिद्ध व्हावे लागेल….
आज मी आणि माझ्यासोबत निरोप देण्यासाठी जमलेल्या सर्व विदयार्थ्यांची ही अवस्था अशीच भावनाकुल झाली आहे. आज मागील अनेक जुन्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत.
घेताना आज निरोप शाळेचा,
आले भरूनीया डोळे….
शाळेतील दिवस बनले,
स्मरणाच्या पुस्तकातील पाने….
मित्र हो, काही वर्षापूर्वी माझे था. शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो शिल्पकार ज्याप्रमाणे ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो – त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला, आमचे व्यक्तिमत्त्व घडवले.
त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. माणूस म्हणून कसे जगावे व वागावे हे शिकवले. अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला, साहित्य इ. क्षेत्रातील आमची आवड जोपासली. आम्हाला शिस्त लावली. एखादी चूक आम्ही केल्यावर शिक्षा केली त्याचबरोबर आम्ही चांगले काम केल्यावर आमचे कौतुक ही केले. या शाळेला मी कधीच विसरू शकणार नाही. या शाळेच्या प्रत्येक घटकाने आम्हाला खूप काही दिले आहे.
सुरवंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू,
नवे जग, नवी आशा, शोध घेण्याची जबर मनिषा,
या शाळेने लावले वळण, त्यावर चढवू यशाची चढण …
ही शाळा ज्ञानाचे मंदिर आहे. इथे आम्ही सर्वधर्मसमभाव, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रभक्ती, स्वच्छता, आदरभाव, एकता, बंधुता, सहकार्य इ. अनेक मूल्ये शिकलो.
या शाळेत आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेवर प्रेम करायला शिकलो. गणितासारख्या विषयातुन आयुष्याचं गणित कसं सोडवायचं? हे शिकलो. विज्ञान विषयातील नवनवीन प्रयोगातून आमच्या विषयातील नवनवीन प्रयोगातून आमच्या सृजनशीलतेला वाव मिळाला. विविध क्रीडा स्पर्धातून आमच्या खिलाडूवृत्तीला चालना मिळाली.
या शाळेत मला अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र खेळलो-बागडलो, गप्पा मारल्या, खुप मज्जा केली, दंगाही केला… हे सर्व आम्ही कधीही विसरणार नाही.
सहवास सुटला म्हणून,
सोबत सुटत नाही….
नुसता निरोप दिल्याने,
नाते तुटत नाही….
अशा या आमच्या आवडत्या शाळेचा आज निरोप घेण्याची वेळ आली आहे. आयुष्यात आपल्याला कधी ना कधीतरी निरोप हा घ्यावा लागतोच !
या शाळेतून आम्ही बाहेर पडल्यानंतर शाळेचा, आई-वडिलांचा, गावाचा व आपल्या देशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करू. कळत-नकळत माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी.
बोललो असेन चुकून उलटून,
झाल्या असतील काही चुका…
विसरून सारे दया आशीर्वाद,
मनात काही ठेवू नका ….
धन्यवाद !
जय हिंद, जय महाराष्ट्र !!
Read This :- सेवानिवृत्ती निरोप समारंभ खूप सोपे मराठी भाषण
2) निरोप समारंभ शुभेच्छा भाषण – Farewell Speech in Marathi
सहवास सुटला म्हणून,
सोबत सुटत नाही…
नुस्ता निरोप दिल्याने,
नाते तुटत नाही….
अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.
आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत.
घेताना आज निरोप शाळेचा,
आले भरूनीया डोळे ….
शाळेतील दिवस बनले,
स्मरणाच्या पुस्तकातील पाने..
काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळयाला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणेच या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हांला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले.
आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली.
आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता इ. अनेक गोष्टी इथे आम्ही शिकलो.
निरोपाचा क्षण जणू,
हळव्या त्या फुलांचा …
आठवणींची गर्दी जणू,
क्षण हा विरहाचा….
या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हांला माहित आहे, आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल.
धन्यवाद !
जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी….
जय हिंद, जय महाराष्ट्र !!
Read This :- निरोप समारंभ जबरदस्त मराठी शायरी
3) निरोप समारंभ भाषण मराठी – Nirop Samarambh Bhashan in Marathi

सहवास सुटला म्हणून,
सोबत सुटत नाही….
नुसता निरोप दिल्याने,
नाते तुटत नाही….
अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों……
माझे नाव राज आहे. सर्वांना माझा नमस्कार !
आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत. आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विदयार्थ्यांसाठी भावूक दिवस आहे.
निरोपाचा क्षण जणू,
हळव्या त्या फुलांचा….
आठवणींची गर्दी जणू,
क्षण हा दुःखाचा….
आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊ पण सोबत राहतील त्या फक्त गोड, शरारती आणि खोडकर आठवणी.
घेताना आज निरोप शाळेचा,
आले भरूनिया डोळे….
शाळेतील दिवस बनले,
स्मरणाच्या पुस्तकातील पाने.
काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाने मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो.
त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले.
ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती, मोठ्यांचा आदर, सहकार्य इ. गोष्टी शिकलो.
निरोप नव्हे हा,
ओलावा माणुसकीचा…..
विसरू कसे आम्ही,
क्षण हा सौख्याचा !!
या शाळेने आम्हाला खूप शिकवले आहे. या शाळेतून बाहेर पडणारा विदयार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे.
तुम्हा सर्वांचे धन्यवाद ! जर कळतनकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा !
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी….
नजरेत नेहमी नवी दिशा असावी !!
Read More :-
निरोप समारंभ भाषण शिक्षकांसाठी (Nirop Samarambh Bhashan Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.
Such a nice essay it is thank U to MDS blog
thank you for such a nice comment.
I am satisfied with this speech.
This speech is really beautiful and all the things that are related to send of program are included in this speech.