क्या आप निरोप समारंभ शायरी (Nirop Samarambh Shayari) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको निरोप समारंभ जबरदस्त मराठी शायरी बताई है. तो आइए जानते हैं
निरोप समारंभ शायरी – Nirop Samarambh Shayari in Marathi
निरोपाच्या हळव्या क्षणी,
दाटून येती आठवणी,
डोळ्यात साठते पाणी,
मूक होते वाणी….
निरोपाचा क्षण जणू,
हळव्या त्या फुलांचा,
आठवणींची गर्दी जणू,
क्षण हा विरहाचा….
मोठे भाग्यवान आम्ही,
गुरू आपल्यासम लाभले,
सहवासाने आपल्या,
जीवन आमचे धन्य झाले ….
जीव लावला गुरूजनांनी,
आई-वडिलांसम आम्हांला,
कसे सांगू किती दुःख होते,
सोडून जाताना तुम्हांला
निरोप नव्हे हा,
ओलावा माणुसकीचा,
विसरू कसे मी,
क्षण हा सौख्याचा….
ती मस्ती, तो धिंगाणा,
रूंजी घालतोय मनात,
अजूनही वाटते धावावे,
विद्यालयाच्या प्रांगणात…
बोलले असेन चुकून उलटून,
झाल्या असतील काही चुका,
विसरून सारे दया आशीर्वाद,
मनात काही ठेवू नका….
निरोपाचा क्षण नाही,
शुभेच्छांचा सण आहे,
पाऊल बाहेर पडताना,
रेंगाळणारं मन आहे …
निरोपाच्या या हळव्या क्षणांना,
मनात अलगद जपून ठेवू,
रुसवे-फुगवे सोडून देऊ,
प्रेमळ क्षणांना सोबत नेऊ….
निरोप देताना आपुले,
मन होई हे जड,
हे गुरु-शिष्याचे नाते,
श्वाश्वत राहो अखंड गोड..
Read This :- छत्रपती शिवाजी महाराज मराठी शायरी
निरोप समारंभ मराठी शायरी (Nirop Samarambh Shayari in Marathi) का यह कलेक्शन आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं