तुम्ही मराठीत पोपट निबंध (Parrot Essay in Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये, मी तुम्हाला माझ्या आवडता पक्षी पोपट वर निबंध सांगितला आहे. जे विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. तर जाणून घेऊया
1) पोपट 10 ओळी मराठी निबंध – Popat Nibandh Marathi
- पोपट हा एक खूप सुंदर पक्षी आहे.
- तो हिरव्या – पोपटी रंगाचा असतो.
- त्याची चोच लाल आणि बाकदार असते.
- त्याच्या मानेवर काळ्या रंगाचा पट्टा असतो.
- पोपटाला समूहाने रहायला फार आवडते.
- तो मिठू-मिठू असा आवाज करतो.
- तो मनुष्याच्या आवाजाची नक्कल करू शकतो.
- नर पोपटाला राघू आणि मादीला मैना असे म्हणतात.
- त्याला हिरवी मिरची व पेरू खूप आवडतो.
- पोपट हा अतिशय हुशार पक्षी आहे.
2) पोपट पक्षी निबंध मराठी – Parrot Essay in Marathi

पोपट हा खूपच सुंदर पक्षी आहे. तो सर्वांनाच खूप आवडतो. त्याचा रंग हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. तो झाडाच्या डोलीत राहतो. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वलय असते.
पोपट हा एक शाकाहारी पक्षी आहे. तो दाणे, फळे, पाने, बिया खातो. तसेच त्याला आंबा, पेरू, मिरची आणि कठीण कवचाची फळे खूप आवडतात.
पोपट मिठू मिठू बोलतो म्हणून लोक त्याला पिंजयात ठेवतात. तो सर्वांच्या बोलण्याची नक्कल हुबेहुब करतो. पोपट हा पक्षी गटाने एकत्र राहणारा पक्षी आहे.
पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. पोपट समूहाने जेव्हा एकत्र उडतात, ते दृश्य खूपच सुंदर असते. हा पक्षी खूप हुशार पक्षी आहे. त्यामुळे तो शिकवलेली कोणतीही भाषा सहज शिकतो. त्याला पक्ष्यांचा पंडित असेही म्हणतात.
भारतातील लोक त्याला राम-राम, नमस्ते, स्वागतम् यासारखे शब्द शिकवतात. बरेच लोक त्याला कसरती करण्यास शिकवतात. भविष्य सांगणारे लोक व सर्कस मध्ये काम करण्यासाठी पोपटाचा उपयोग करतात.
पोपट सर्वांचे मनोरंजन करतो. तो खूप सुंदर पक्षी आहे. त्यांची सुरक्षा करने गरजेचे आहे. मनुष्य आपल्या फायद्यासाठी जंगलतोड करत आहे, त्यामुळे सर्व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यासाठी वेळीच उपाय करायला हवेत. नाहीतर असे पक्षी आपल्याला पहायला मिळणार नाहीत.
Read More :-
पोपट पक्षी निबंध मराठी (Parrot Essay in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त होता, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा.