क्या आप राजमाता जिजाऊ मराठी भाषण (Rajmata Jijau Bhashan Marathi) की तलाश कर रहे हैं तो यह पोस्ट आपके लिए एकदम सही है. आज मैंने आपको जिजाऊ सुंदर मराठी भाषण बताया है जिसे कि आप कंपटीशन में बोल सकते हैं. तो आइए पढ़ते हैं
1) राजमाता जिजाऊ भाषण मराठी – Rajmata Jijau Speech in Marathi
स्वराज्याचा ज्यांनी….
घडविला विधाता….
धन्य त्या स्वराज्य जननी….
जिजामाता !!
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों..सर्वांना माझा नमस्कार !!
आज मी आपल्यासमोर महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. आज १२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा !!
मित्रहो, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. सन १६०५ साली त्यांचा विवाह शहाजीराजांशी झाला.
जिजाबाई व शहाजीराजे यांना संभाजी-राजे व शिवाजी राजे अशी दोन पुत्ररत्ने होती. राजमाता जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या. त्या लहानपणापासूनच चाणाक्ष व तेज होत्या.
मित्र हो, राजमाता जिजाऊंना त्यांचे थोरले बंधू दत्तोजी यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी त्याचबरोबर राजकारण, न्यायनीती यांचेसुध्दा धडे दिले.
राजमाता जिजाऊंनी शिवरायांना लहान वयातच रामायण, महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू दिले. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी शिवबा व प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला.
राजमाता जिजाऊंच्या संस्काराने व शिकवणीने शिवरायांनी मावळ्यांसोबत हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जिजाऊंचे स्वप्न साकार केले.
अशा या महान राजमाता जिजाऊंचे १७ जून १६७४ रोजी निधन झाले. शेवटी जाता जाता एवढचं म्हणेन……
शिवबासारखा असावा पुत्र…
जिजाऊसारखी माता….
तरच देशात नांदेल….
न्याय आणि शांतता !!
जय जिजाऊ ! जय शिवाजी !
Read More :-
2) राजमाता जिजाऊ मराठी भाषण – Rajmata Jijau Bhashan in Marathi

ज्यांनी घडविला,
महाराष्ट्राचा भाग्यविधाता,
धन्य त्या थोर,
जिजाऊ राजमाता !
आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार
आज १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ! प्रथम या थोर जिजाऊ आईसाहेबांना माझा मानाचा मुजरा !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणा-या जिजाऊ आदर्श राजमाता होत्या
जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयात त्यांचा विवाह शूर, पराक्रमी वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
राजमाता जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा अनमोल खजिना होता. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तत्व या तीन गुणांचा सुरेख संगम त्याच्यांत झालेला होता. त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते.
हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. लहानपणी शिवबांना रामायण तसेच महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या, शिक्षणाबरोबरच त्यांनी शिवबांना तलवार बाजी व युद्धकौशल्यही स्वतः शिकवले.
शिवरायांचे व्यक्तिमत्त्व आदर्श घडवले. राजमाता जिजाऊ, ह्यां शिवरायांच्या आदयगुरू होत्या. त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी जिजाऊंनी खंबीर मार्गदर्शन केले.
शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा कैद व सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांचा सामना करण्याची प्रेरणा त्यांनी शिवाजी राजेंना दिली.
जिजाऊ गोरगरीब, सामान्य जनतेच्या माऊली आणि सावली होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना रयतेचा तसेच स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून तयार केले. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक पाहून जिजाऊ माऊली खुश झाल्या.
यानंतर १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी पाचाड या गावी आपले जीवन- कार्य संपवले व स्वर्गाची वाट धरली. राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहान रोपट्याचा वटवृक्ष झाला. अशा या थोर राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद !
जय जिजाऊ, जय शिवराय,
जय महाराष्ट्र !
संक्षेप में
राजमाता जिजाऊ पर मराठी भाषण आपके लिए कितना उपयोगी था कमेंट में हमें जरूर बताएं और इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा !
Jay maharashtra