तुम्ही राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण सोपे व अतिशय सुंदर मराठी निबंध आहेत. तर जाणून घेऊया.
राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध

राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे राजे होते. त्यांनी आपल्या काळात कोल्हापूर संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांच्या कार्याबद्दल अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्यापैकी मला भावलेली ही एक आठवण….
समाजात ज्या काळात रूढी-परंपरा, जात-पात पाळली जात असे, त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या व्यक्तीला ‘सत्यसुधारक हॉटेल’ सुरू करून दिले.
गंगाराम कांबळे या अस्पृश्य व्यक्तीचे हे हॉटेल चालावे म्हणून महाराजांनी एक नामी शक्कल लढवली. सकाळच्या वेळी राजर्षी शाहू महाराज घोडागाडीतून फेरफटका मारत असत. त्यावेळी ते गंगाराम कांबळेच्या हॉटेलसमोर थांबायचे.
आपल्या भारदस्त आवाजात ते गंगारामला घोडागाडीत बसलेल्या सर्वांना चहा आणायला सांगत. स्वत: महाराज चहा पितात म्हटल्यावर घोडागाडीतील सर्वांना चहा पिणे भाग पडे. राजर्षी शाहू महाराजांची सही कुणाला हवी असेल तर गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये या म्हणून ते सांगायचे.
यामुळे गंगारामच्या हॉटेलवर नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली. राजर्षी शाहू महाराज येणाऱ्या प्रत्येकाला गंगारामच्या हातचा चहा पाजून मग सही करत. राजर्षी शाहू महाराजांनी अशाप्रकारे गंगारामच्या जीवनात क्रांती घडवून आणली.
Read This :-
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडा विषयक कार्य निबंध ३०० शब्द
- राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
- 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी
राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.