तुम्ही रक्षाबंधन मराठी निबंध (Raksha Bandhan Nibandh Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधन निबंध सांगितले आहे. तर जाणून घेऊया
रक्षाबंधन मराठी निबंध – Raksha Bandhan Nibandh Marathi

रक्षाबंधन हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या पवित्र बंधनाचा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा . अर्थात रक्षणाचा पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन. हा सण भाऊ – बहिणीच्या पवित्र नात्याचे सुंदर प्रतिक आहे.
रक्षाबंधन या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. ती भावाच्या सुख, समृध्दी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. शिवाय भेटवस्तू ही देतो. या दिवशी घरो-घरी गोड पदार्थ बनवले जातात.
आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बहिणी दूर राहणाऱ्या भावाला कुरियरने राखी पाठवतात. या दिवशी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही अनेक बहिणी राखी पाठवतात. असा हा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे व सभ्यतेचे प्रतिक आहे.
Read More :-
रक्षाबंधन मराठी निबंध (Raksha Bandhan Essay in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.