क्या आप 26 जनवरी, गणतंत्र दिवस पर मराठी निबंध (26 January, Republic Day Essay in Marathi) लिखना चाहते हैं तो यह पोस्ट आपके लिए एकदम सही है. आज मैं आपको प्रजासत्ताक दिन पर मराठी निबंध बताऊंगा. इस पोस्ट में दो निबंध मैंने आपको बताए हैं. तो आइए पढ़ते हैं
1) प्रजासत्ताक दिन मराठी निबंध – Prajasattak Din Marathi Nibandh
- २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा करतो.
- हा दिवस भारताचा राष्ट्रीय सण आहे.
- २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले.
- भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत
- या दिवशी राजधानी दिल्ली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- या दिवशी आपल्या देशातील शूरवीरांचे स्मरण केले जाते.
- या दिवशी आपला भारत देश लोकशाही व प्रजासत्ताक देश बनला.
- भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.
- प्रजासत्ताक दिन हा भारताच्या एकतेचे व अखंडतेचे प्रतीक आहे.
Read More :- 26 जानेवारी मराठी भाषण
2) 26 जानेवारी मराठी निबंध – 26 January Essay in Marathi

प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारीला साजरा केला जातो. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी १९५० मध्ये भारतात संविधान लागू करण्यात आले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.
या दिवशी नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी भारताचे राष्ट्रपती प्रथम तिरंगा ध्वज फडकवतात. यानंतर तेथे उपस्थित असलेले लोक एकत्रितपणे उभे राहून राष्ट्रगीत म्हणतात. यानंतर विविध सांस्कृतिक व पारंपारिक प्रदर्शनी काढण्यात येते. या दिवशी नवी दिल्लीतील भारतीय सैन्यदल, हवाईदल व नौदलाची भव्य परेड काढण्यात येते. यातून देशाचे सामर्थ्य दाखवले जाते.
या दिवशी शाळांना तोरणे-पताका लावून सजवले जाते. शाळांमध्ये झेंडावंदन, कवायत, प्रभातफेरी, भाषण, देशभक्तीगीत इ. कार्यक्रम घेतले जातात. हा दिवस देशभरात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम जागृत होते.
3) गणतंत्र दिवस मराठी निबंध – Republic Day Essay in Marathi
दरवर्षी २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा राज्यकारभार २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाला.
२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाचे संविधान अस्तित्वात आले व भारत लोकशाही प्रधान देश बनला. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमांचे आयो- जन केले जाते. सकाळी राष्ट्रपतींनी ध्वजारोहण केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. या सोहळ्यात तिन्ही भारतीय सैन्यदल (जल, भूमी, नौदल) सहभागी होतात.
या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी मोठी मिरवणूक काढतात. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा व धाडसी मुलांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव करण्यात येतो.
राजधानी दिल्लीसह देशातील सर्व शाळा, सरकारी कार्यालय व इतर ही ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. शाळांना तोरणे, पताका लावल्या जातात. मुले या दिवशी खूप आनंदी असतात. शाळांमध्ये संचलन, देशभक्तीपर गीते, भाषणे, खाऊवाटप इ. कार्यक्रमांचे आयो- जन केले जाते.
२६ जानेवारीचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा दिवस आपल्याला देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीर पुत्रांची आठवण करून देतो. प्रत्येकात राष्ट्रीय अभिमान व देशभक्तीची भावना जागृत करतो.
संक्षेप में
26 जनवरी, गणतंत्र दिवस पर मराठी निबंध (26 January, Republic Day Essay in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट में हमें जरूर बताएं और इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा !