Marathi Speech

सेवानिवृत्ती निरोप समारंभ खूप सोपे, सुंदर मराठी भाषण

क्या आप सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण (Retirement Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको सेवानिवृत्ती निरोप समारंभ खूप सोपे व सुंदर भाषण बताया है. तो आइए जानते हैं

1) सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण 10 ओळी – Retirement Speech in Marathi

निरोपाचा क्षण जणू,
हळव्या त्या फुलांचा…
आठवणींची गर्दी जणू,
क्षण हा सौख्याचा…

  1. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग, उपस्थित पालक वर्ग तसेच माझ्या सर्व लाडक्या विदयार्थ्यांनो….
  2. सर्वांना माझा नमस्कार.
  3. आज आपण सर्वजण इथे माझ्या भावपूर्ण निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत.
  4. मित्र हो, निरोपाच्या ह्या क्षणी मी भावनाकूल झालो आहे, पण प्रत्येकास आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर निरोप हा घ्यावा लागतो.
  5. मी मुख्याध्यापक म्हणून सेवा करीत असताना मला अनेक चांगले अनुभव आले ज्या क्षणाचे आपल्यापैकी अनेकजण साक्षीदार आहेत.
  6. मी जरी शिस्तप्रिय व वक्तशीर असलो तरीही तुमचे – माझे नाते मात्र मैत्रीचे स्नेहाचे होते आणि पुढेही निरंतर राहील.
  7. आज माझ्या शाळेचे अनेक विद्यार्थी अगदी प्रगत शेतकन्यांपासून ते जिल्हयाच्या कलेक्टरपर्यंत प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे.
  8. मी जबाबदार, कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणून सेवाकार्य करताना तुम्ही मला केलेले सहकार्य मी कधीही विसरणार नाही.
  9. मी कळत-नकळत जर कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व !
  10. आज आपण सर्वजण या भावपूर्ण सोहळ्यात सहभागी झालात व मला पुढील निरामय, सुखी, आनंदी अशा आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.

धन्यवाद ! 

जय हिंद, जय महाराष्ट्र !

Read This :- सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

2) सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण – Retirement Speech in Marathi

Retirement Speech in Marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
तुमच्या आयुष्यात आनंद यावा,
यापुढचा प्रवासही हसरा अन,
सुख आनंद देणारा व्हावा…

आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोपमूर्ती मा. पाण्डेय सर, प्रमुख पाहुणे, गुरुजनवर्ग, सर्व मान्यवर, आणि सरांमुळे स्वतः चे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वसर्वांना माझा नमस्कार.

सर, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बालरूपी मनावर उत्तम असे संस्कार करून आमचे आदर्श व्यक्तिमत्व घडवले.

आज तुमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत. समाजात शाळेचे-गावाचे-आई-वडिलांचे नाव उंचावत आहेत. तुम्ही वेळप्रसंगी बापासारखे कठोर होऊन शाळेला शिस्त लावली व वेळप्रसंगी माया लावून आईसारखी आमची काळजीही घेतली.

सर, तुम्ही आमच्या शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी झटलात. कधीही वेळ-काळ न पाहता सतत् शाळेचा विचार केला. त्यामुळे आपली शाळा आज चांगलीच नावारूपाला आली आहे. मी परीस कसा असतो हे पाहिलो नाही पण तुमच्या परीसस्पर्शाने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झालेले आम्ही पाहिले आहे.

एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा अन आसपासचा निसर्ग आनंदी व्हावा, त्याप्रमाणे तुम्ही या शाळेच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. तुम्ही ज्ञानदानाबरोबर दीनदलित, गोरगरीब समाजासाठी खूप झटलात हे आम्ही कधीही विसरणारे नाही. अडचणींवर मात कशी करावी हे तुम्ही आम्हांला शिकवता-शिकवता सहज दाखवून दिले.

सर, तुम्ही आम्हाला भरभरून खूप काही दिले आहे, ज्याची उतराई करणे आम्हाला अशक्य आहे. इथून जाताना कळत-नकळत आमची चूक झाली असेल तर आम्हांला माफ करा. तुमची प्रेरणा-कार्य आम्हाला नवीन बळ देत राहील.

सर, तुम्ही आज निवृत्त जरी झालात तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील ही आशा करतो. तुमचे पुढील जीवन सुखी, आनंदी-आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना !

शब्दांनाही कोडं पडावं :-
अशी काही माणसं असतात,
आपण किती भाग्यवान असतो,
जेंव्हा ती आपल्यात असतात.

धन्यवाद !
जय हिंद, जय महाराष्ट्र !

Read More :-

सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण (Retirement Speech in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा

यह पोस्ट कितनी उपयोगी थी ?

Average rating / 5. Vote count:

अब तक कोई वोट नहीं, इस पोस्ट को रेट करने वाले पहले व्यक्ति बनें

MDS Thanks 😃

पोस्ट अच्छी लगी तो सोशल मीडिया पर हमें फॉलो करें

हमें खेद है कि यह पोस्ट आपके लिए उपयोगी नहीं थी !

हमें बताएं कि हम इस पोस्ट को कैसे बेहतर बना सकते हैं ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker