Marathi Speech

राजर्षी शाहू महाराज सुंदर मराठी भाषण

क्या आप राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी (Rajarshri Shahu Maharaj Bhashan in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको शाहू महाराज मराठी भाषण बताया है. तो आइए जानते हैं

1) राजर्षी शाहू महाराज सोपे भाषण – Shahu Maharaj Bhashan Marathi

राजर्षी शाहू महाराज भाषण
  1. सर्वांना नमस्कार .
  2. माझे नाव …….. आहे.
  3. आज मी आपणासमोर राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे.
  4. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती, बहुजनांचा आधार व थोर लोकराजा होते. 
  5. त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.
  6. त्यांचे मूळ नाव यशवंत, आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते.
  7. १७ मार्च १८८४ रोजी चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेतले व त्यांचे नव्याने ‘शाहू’ असे नामकरण केले.
  8. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश दिला.
  9. त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा इ. क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले.
  10. दुर्देवाने, राजर्षी शाहू महाराज यांनी ६ मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला.

अशा या महान जनतेचा राजा,
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र !

Read More :-

2) राजर्षी शाहू महाराज भाषण – Rajshree Shahu Maharaj Speech in Marathi

इतिहासा तू वळूनी,
पहा पाठीमागे जरा ….
झुकवून मस्तक करशील,
राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा ….

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.

आज ६ मे ! राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी ! सर्वप्रथम, बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक छत्रपती , राजर्षी शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा !

राजर्षी शाहू महाराज हे विशाल मनाचा लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांचा जन्म र६जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.

त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे हे होते. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंत याला दत्तक घेतले आणि नव्याने ‘शाहू’ असे त्यांचे नामकरण केले.

राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तृत्व विशाल आणि नेतृत्व अजोड होते. ते राजघराण्यात राहूनही लोकांसाठी जगले आणि रयतेचा राजा-लोकराजा ठरले. छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून जगताना ‘छत्रपती’ ही बिरुदावली त्यांनी नुसती लावली नाही तर ख-या अर्थाने ती कर्तृत्वाने सार्थ केली.

छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील बहुजन, मागासलेल्या, तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी जातीप्रथेला विरोध, कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतीगृह उभारणी इ. अनेक समाज सुधारणा केल्या.

राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी सहकार्य केले. चित्रकार आबालाल रहिमान यांसारख्या अनेक कलावंतास राजाश्रय दिला. कोल्हापूर येथे ‘शाहूपुरी’ ही गुळाची बाजारपेठ सुरु केली. त्यांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. त्यांनी कृषी, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा अशा क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले.

अशा या थोर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ६ मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.

या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !

धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र,
जय छ. शाहू महाराज !!

संक्षेप में

दोस्तों मुझे उम्मीद है आपको राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी (Rajarshri Shahu Maharaj Bhashan in Marathi) की जानकारी मिल गई होगी अगर आपको यह पोस्ट अच्छी लगी तो इसे जरूर शेयर कीजिएगा

नई नई जानकारियों को जानने के लिए MDS Blog के साथ जुड़िए जहां की आपको कई तरह की शिक्षात्मक जानकारियां दी जाती है. MDS Blog पर यह पोस्ट पढ़ने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद !

यह पोस्ट कितनी उपयोगी थी ?

Average rating / 5. Vote count:

अब तक कोई वोट नहीं, इस पोस्ट को रेट करने वाले पहले व्यक्ति बनें

MDS Thanks 😃

पोस्ट अच्छी लगी तो सोशल मीडिया पर हमें फॉलो करें

हमें खेद है कि यह पोस्ट आपके लिए उपयोगी नहीं थी !

हमें बताएं कि हम इस पोस्ट को कैसे बेहतर बना सकते हैं ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker