तुम्ही मराठीत राजर्षी शाहू महाराज निबंध (Shahu Maharaj Essay in Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला शाहू महाराज मराठी निबंध सांगितले आहेत. तर जाणून घेऊया.
राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध – Shahu Maharaj Essay in Marathi

राजर्षी शाहू महाराज हे विशाल मनाचा लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते.
त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे व आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत ला दत्तक घेतले. आणि त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण केले.
शाहू महाराज लहानपणा पासूनच कुशाग्र बुध्दीचे होते. १८९४ साली त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्वपूर्ण काम केले.
संस्थानातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत दिले. त्यांनी जातीप्रथेला विरोध केला. विधवा पुनर्विवाह, शिष्यवृत्ती योजना, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, पाणी व्यवस्था, वसतीगृह उभारणी इ. अनेक समाजसुधारणा केल्या.
सन १८९६ मध्ये पडलेला दुष्काळ व त्यानंतर प्लेगची साथ अशा संकटकाळी त्यांनी दुष्काळी कामे हाती घेतली. स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रम स्थापना, विहीरी खणणे इ. अनेक समाज उपयोगी कार्ये त्यांनी केली.
त्यांनी डॉ.आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले. अनेक कलावंताना राजाश्रय दिला. त्यांनी कृषी, शिक्षण, उदयोग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले. ६ मे १९२२ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
अधिक पोस्ट वाचा :-
- राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडा विषयक कार्य निबंध
- राजर्षी शाहू महाराज सुंदर मराठी भाषण
- राजर्षी शाहू महाराज पर हिंदी निबंध
आजची माहिती – Shahu Maharaj Nibandh Marathi
मला आशा आहे की तुम्हाला राजर्षी शाहू महाराज मराठी निबंधाची माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा.