तुम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडा विषयक कार्य निबंध शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मी या विषयावर 300 शब्दांचा एक अप्रतिम निबंध सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊया.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडा विषयक कार्य निबंध ३०० शब्द

राजर्षी शाहू महाराज हे एक लोककल्याणकारी आणि प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांनी साहित्य, कला, संगीत, क्रीडा इ. क्षेत्रांना प्रोत्साहन दिले. कोल्हापूरला मल्लविद्येची पंढरी आणि कुस्तीचे माहेरघर बनवण्याचे सारे श्रेय हे राजर्षी शाहू महाराजांना जाते.
कागलमध्ये असतानाच शाहू महाराजांना कुस्तीच्या आखाड्याचे आकर्षण निर्माण झाले. वयाच्या केवळ नवव्या वर्षी ते कागलच्या मैदानात उतरले आणि मारुती रुकड़ीकर यांना चितपट करून मैदान मारलेदेखील।
मैदानात उतरून कुस्ती खेळणारे राजर्षी शाह महाराज हे राजघराण्यातील पहिले व्यक्ती होते. करवीर संस्थानात त्यांचा राज्यारोहण समारंभ झाल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक मल्ल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सन १८९५ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जुन्या राजवाड्यातील विस्तीर्ण मोतीबागेत तालीमखाना सुरू केला. या तालमीच्या प्रमुख प्रवेशद्वारावरच एक फलक लावला. त्यावर ‘पहिली शरीरसंपत्ती, दुसरी पुत्रसंपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती असेल तोच खरा पुण्यान !’ असे लिहले.
शाहू महाराजांच्या प्रयत्नामुळे संस्थानात गावोगांवी तालमी सुरू झाल्या. त्यांनी विजेत्या पैलवानांसह पराभूतांनाही बक्षिसे देऊन मल्लविद्येचा गौरव केला.
करवीरच्या मल्लांनी उत्तरेत जाऊन धिप्पाड मल्लांना आस्मान दाखवावे यासाठी शाहू महाराजांनी मोहीम हाती घेतली. दहा कलेमी योजना तयार करून करवीरच्या मल्लांवर मुक्तहस्ते खर्च केला.
यामुळे करवीर संस्थांनात रुजलेल्या मल्लविद्येने उत्तरेतही दबदबा निर्माण केला. उत्तर भारतातल्या मल्लांनाही करवीरबद्दल कुतुहल निर्माण करणारे शाहू महाराज मल्लविद्येसह मल्लांसाठीही नवसंजीवनी देणारे वस्ताद ठरले.
राजर्षी शाहू महाराजांनी एकट्या करवीर नगरीत शंभराहून अधिक तालमी सुरू केल्या. प्रत्येक तालमीत इर्षेने पैलवान घडवले. राजेंच्या प्रयत्नांना मल्लांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
पंजाबचा कीर्तीशाली मल्ल हमदुकाका याला शिवाप्पा बेरड याने पन्हाळ्याच्या मैदानात आस्मान दाखवले. शाहू राजेंच्या प्रयत्नामुळे उत्तरेकडील मल्लांची घमेंड जिरली. यानंतर अनेक मल्लांनी शाहू राजांकडे आश्रय घेतला.
पुढे खाशाबा जाधव यांनी ऑलिंम्पिकमध्ये मिळवलेल्या पहिल्या कुस्तीतील पदकाची बीजेही राजेंच्या प्रयत्नातच दडली होती. शाह राजांमुळे कोल्हापुर हे मल्लविद्येचे माहेरघर म्हणून लौकिकास आले.
राजर्षी शाहू महाराज १९०२ मध्ये परदेशात गेले होते. रोममध्ये त्यांनी ऑलिंम्पिक सामन्याचे स्टेडियम पाहिले. पुढे करवीरमध्ये परतल्यानंतर त्यांनी खासबागेत कुस्तीसाठी जगप्रसिद्ध मैदान तयार केले. मैदानात मावळतीच्या बाजूला खास महिलांसाठी त्यांनी बैठकव्यवस्था केली.
शाहू महाराजांनी कुस्तीबरोबरच मर्दानी खेळांनाही उत्तेजन दिले. त्यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. ते शब्दांत मांडणे तितकें सोपे नाही.
Read This :-
- राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध
- राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
- 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडा विषयक कार्य निबंध तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.