क्या आप छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको शिवाजी महाराज सोपे मराठी निबंध बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
शिवाजी महाराज निबंध मराठी – Shivaji Maharaj Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, धाडसी व पराक्रमी योद्धा होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते.
शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडिलांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. तसेच दादोजी कोंडदेवांनी त्यांना युद्धकौशल्य व नीतिशास्त्र शिकवले.
बालवयातच माता जिजाऊ त्यांना रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगत. त्यामुळे शिवरायांच्या अंगी पराक्रम, प्रजादक्षता हे गुण आले. माता जिजाऊंनी बालवयातच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न बिंबवले.
शिवरायांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांना तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यांनी गनिमी कावा, दृढ इच्छाशक्ती व मूठभर मावळ्यांच्या साथीने अनेक गड व किल्ले जिंकले. अनेक बलाढ्य शत्रूना पराभूत केले.
६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. त्यांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर व सन्मान होता. शेतकयांना मान होता.
अखेर ३ एप्रिल १६८० मध्ये आपल्या राजांची प्राणज्योत मालवली. छत्रपती शिवाजी हे महाराज हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहेत.
जय जिजाऊ ! जय शिवाजी !
Read More :-
- छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
- निरोप समारंभ भाषण मराठी
- महाशिवरात्रि पर मराठी निबंध
- माझी शाळा निबंध मराठी
- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
शिवाजी महाराज निबंध मराठी (Shivaji Maharaj Essay in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये निबंध अच्छा लगा तो इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.