क्या आप छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आपने एकदम सही पोस्ट को खोला है. इस पोस्ट में मैंने आपको छत्रपती शिवाजी महाराज पर मराठी भाषण बताया है जोकि सभी बच्चों के लिए उपयोगी है. तो आइए सबसे पहले कुछ जरूरी पॉइंट्स पढ़ते है :-
नाव | छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले |
जन्म झाला | १९ फेब्रुवारी १६३० |
वडिलांचे नाव | शहाजीराजे भोसले |
आईचे नाव | राजमाता जिजाऊ |
राज्याभिषेक | ६ जून इ. स.१६७४ |
मृत्यू | ३ एप्रिल १६८० |
1) छत्रपती शिवाजी महाराज फक्त १० ओळींचे सुंदर भाषण
- सर्वांना नमस्कार.
- माझे नाव सचिन आहे.
- आज १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती !
- सर्वप्रथम, मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते.
- छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व लोककल्याणकारी राजा होते.
- शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते.
- वयाच्या केवळ १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत त्यांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली.
- दुर्देवाने, ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला.
- त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते.
बोला – शिवाजी महाराज की जय !
जय महाराष्ट्र ! जय जिजाऊ !
2) शिवाजी महाराज भाषण मराठी – Shivaji Maharaj Bhashan Marathi 2023
आले किती, गेले किती,
उडून गेले भरारा….
संपला नाही आणि संपणारही नाही,
माझ्या शिवबाचा दरारा….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार….
आज १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत. सर्वप्रथम, तुम्हां सर्वांना या मंगलमय शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !
मित्रांनो, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तृत्ववाने वीरपुत्र मिळाला. ज्याने आपल्या अजोड पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने, जिद्दीने होत्याचं नव्हत करून आणि नव्हत्याचं होतं करून दाखवलं …
मूठभर मावळ्यांच्या जोरावर आभाळभर शौर्य गाजवले ….
मित्रांनो, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. मुघलांच्या कैदेत अनेक मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. शेतक-यांना कोणी कैवारी नव्हता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता – एक जगमगता पेटता अंगार !
अखेर ती वेळ आली. सहयाद्रीची गर्जना झाली. तो सोन्याचा दिवस उजाडला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी थोर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला ….
मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना! ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्वराज्याची सूत्रे हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. त्यांनी गोरगरीब, सर्वसामान्य रयतेच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली.
त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे, शिवा काशीद, मुरार- बाजी असे जीवाला जीव देणारे अनेक मावळे घडवले. अफजलखान, शाहिस्ते- खान, औरगंजेब यासारख्या बलाढ्य शत्रूंशी लढा दिला. अनेक गड, किल्ले जिंकले, स्वराज्यावर जीवापाड प्रेम केले.
शिवाजी महाराजांपूर्वी अनेक राजे होऊन गेले व शिवरायानंतरही झाले. पण सर्वात आदर्श राजा – छत्रपती शिवाजी महाराज होय. याचे कारण त्यांचे स्वराज्य प्रेमनिष्ठा, पराक्रम आणि निष्कलंक चारित्र्य. शिवाजी महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते. ते आपल्या प्रजेशी नेहमी आपुलकीने व प्रेमाने वागत. स्वतःच्या कुटुंबाला विसरून ते प्रजेसाठी दिवस-रात्र खपत.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वगुण संपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे राजा होते.
हवा वेगाने नव्हती ….
हवेपेक्षाही त्यांचा वेग होता,
अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा ..
नेक होता ….
असा जिजाऊंचा शिवबा,
लाखात नव्हे तर जगात एक होता.
जगात एक होता.
दुर्देवाने, अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी ३ एप्रिल १६८० रोजी अखेरचा श्वास घेतला. या महापुरुषाला, आदर्श राजेंना माझे कोटी कोटी प्रणाम !
बोला –
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय जिजाऊ, जय शिवाजी,
जय महाराष्ट्र !
धन्यवाद !
3) छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी – Shivaji Maharaj Speech in Marathi

“हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता,
अन्यायाविरुध्द लढण्याचा इरादा नेक होता,
असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तरजगात एक होता”
सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा !
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित सर्व रसिकहो, सह्याद्रीच्या कड्याकपारींनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील, विशाल नभालाही त्यांच्यासमोर झुकावं वाटेल असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कैवारी, शेतकयांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
इतिहासाचे साक्षीदार, उभे तुमच्या समोर किल्ला एक-एक न्याहळा, आठवा शिवबांचा कारभार …
दिली उभारी मनाला, झाले वाऱ्यावरती स्वार, हर-हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर …
अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले ते राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे होय.
शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. शहाजी राजे भोसले व जिजाऊला हर्ष झाला. त्यांच्या पोटी शिवबाचा जन्म झाला.
माता जिजाऊंनी शिवबांवर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडवले. शिवरायांनी बालवयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्यादृष्टीने विजयी घोडदौड केली. स्वराज्यनिर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपले स्वराज्यनिर्मिती करण्याचे कार्य अविरतणे चालूच ठेवले.
शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजीप्रभू, सूर्याजी, मुरारबाजी, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्यचि तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रताप गडावरील पराक्रम, आग्राहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, तर ते एक युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय करणा-यांचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले. शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. शेतक-यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले.
सिंहाची चाल, गरूडाची नजर,
स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन,
असेच असाव मावळ्यांचे वर्तन,
हीच शिवरायांची शिकवण ..
दुर्देवाने, ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक महान, आदर्श, प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. मित्र हो, शिवरायांचे कार्य, विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा, उत्साह देतात. अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. अशा या थोर महापुरुषाचा जयजयकार झालाच पाहिजे.
बोला – छत्रपती शिवाजी महाराज की जय !
जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ !!
धन्यवाद !
FAQ’s – सतत विचारले जाणारे प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी साजरी केली जाते ?
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला ?
शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला
Read More :–
- छत्रपती शिवाजी महाराज जबरदस्त मराठी शायरी
- राजमाता जिजाऊ मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण
- सुभाषचंद्र बोस मराठी भाषण
शिवाजी महाराज भाषण मराठी (Shivaji Maharaj Speech in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.