क्या आप नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध (Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आपने एकदम सही पोस्ट को खोला है. इस पोस्ट में मैंने आपको सुभाष चंद्र बोस पर मराठी निबंध बताया है. तो आइए जानते हैं
1) सुभाषचंद्र बोस मराठी निबंध – Subhash Chandra Bose Essay in Marathi

- सुभाषचंद्र बोस हे भारताचे एक महान क्रांतीकारी नेता होते.
- त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिसामधील कटक या शहरात झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते.
- त्यांना मोठ्या आदराने ‘नेताजी’ असे म्हटले जाते.
- सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासून खूप स्वाभिमानी तसेच देशप्रेमी होते.
- नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेता होते.
- त्यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केले.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा’ ही प्रसिद्ध घोषणा दिली.
- १८ ऑगस्ट १९४५ मध्ये ताइवान येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले असे म्हटले जाते.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read This : सुभाषचंद्र बोस मराठी भाषण
2) Subhash Chandra Bose Essay information in Marathi
नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक महान देशभक्त व शूर स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा येथील कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती देवी असे होते.
सुभाष चंद्र बोस यांनी कोलकाता येथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे ते भारतीय नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले.
त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली परंतु इंग्रजांच्या क्रूर आणि वाईट वागणुकीमुळे देशवावासीयांची दयनीय अवस्था पाहून नोकरीचा राजीनामा दिला. ते मायदेशी परत आले. आणि त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्याचा निर्णय घेतला.
भारताला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसबरोबर नेताजींनी अनेक चळवळीत भाग घेतला. नेताजींवर अनेक क्रांतीकारी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या.
सुभाष चंद्र बोस यांनी “आजाद हिंद सेना’ स्थापण केली. “जय हिंद”, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा” तसेच “चलो दिल्ली’ अशा घोषणा देऊन भारतीयांना प्रेरित केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १८ ऑगस्ट १९४५ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचे मानले जाते. नेताजींचे महान कार्य आणि योगदान भारतीय इतिहासात अविस्मरणीय होते.
Read This :-
आज की जानकारी
सुभाष चंद्र बोस मराठी निबंध आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.
धन्यवाद !