क्या आप नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी भाषण (Netaji Subhash Chandra Bose Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आपने एकदम सही पोस्ट को खोला है. इस पोस्ट में मैंने आपको सुभाष चंद्र बोस पर मराठी भाषण बताया है जोकि सभी बच्चों के लिए उपयोगी है. तो आइए जानते हैं
सुभाषचंद्र बोस मराठी भाषण – Subhash Chandra Bose Speech in Marathi

“तुम मुझे खून दो
मैं तुम्हें आजादी दूंगा”
ही जबरदस्त घोषणा देवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे भारतमातेचे थोर सुपुत्र म्हणजेच …. नेताजी सुभाषचंद्र बोस !
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.
आज २३ जानेवारी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ! यानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे महान देशभक्त आणि क्रांतिकारी नेता होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिसा राज्यातील कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणा- पासून खूप हुशार आणि देशप्रेमी होते, त्यांनी आपले कलकत्ता येथील शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लंडमधून पुढील उच्च शिक्षण घेतले. तिथे ते ICS ही सर्वोच्च परीक्षा पास झाले. तिथे त्यांना अधिकारी पदाची नोकरी मिळाली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची भावना ठसलेली होती. त्यामुळे त्यांनी इंग्लंडमधील नोकरी सोडून भारतीय स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ते म्हणत की –
संघर्षाने मला मनुष्य बनवलं,
माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला,
जो माझ्यात आधी नव्हता…
सुभाष बाबूंनी मातृभूमीसाठी…आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांनी २१ ऑगस्ट १९४३ रोजी ‘आझाद हिंद सेनेचे’ सरसेनापतीपद म्हणून नेतृत्व केले. अनेक भारतीय तरुण यात सामील झाले. इतकेच कायपण स्त्रियांनाही लष्करी शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘झाशीचे राणी पथक’ स्थापन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस जहालमत वादी होते. त्यांची भाषणे म्हणजे – विचारांच्या पेटत्या मशाली होत्या. ते स्वातंत्र्यासाठी केलेल्या एका भाषणात म्हणतात :- “बंधू व भगिनींनो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जे युद्ध केले आहे, याला तोपर्यंत सुरू ठेवा…जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही. धर्म-पंथ – जात पात विसरून एकत्रित व्हा…”
त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांना प्रेरित केले. ‘जय हिंद’ आणि ‘चलो दिल्ली’ अशा प्रसिध्द घोषणा दिल्या. त्यांच्याबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. दुर्देवाने, १८ ऑगस्ट १९४५ रोजी ताइवान येथे एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. अश्या या महान, शूर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्य ते नेताजी सुभाषचंद्र बोस !
धन्य तो भारत देश !
बोला – नेताजी सुभाषचंद्र बोस की जय हो !
धन्यवाद !
जय हिंद, जय भारत !
Read More :-
- सुभाषचंद्र बोस पर निबंध मराठी में
- छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
- 26 जनवरी पर मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण
- निरोप समारंभ भाषण मराठी
सुभाषचंद्र बोस मराठी भाषण (Subhash Chandra Bose Speech in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.