क्या आप स्वामी विवेकानंद मराठी भाषण (Swami Vivekananda Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो यह पोस्ट आपके लिए एकदम सही है. आज मैंने आपको स्वामी विवेकानंद पर मराठी भाषण बताया है जिसे कि आप कंपटीशन में बोल सकते हैं. तो आइए पढ़ते हैं
स्वामी विवेकानंद मराठी भाषण – Swami Vivekananda Speech in Marathi

भारताच्या अध्यात्माची महती,
जगाला दाखवून दिली…
स्वामी विवेकानंदानी,
शिकागोची धर्मपरिषद गाजवली !
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो,
आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ! प्रथम या थोर महात्म्यास माझें त्रिवार अभिवादन ! स्वामी विवेकानंद हे थोर तत्त्वज्ञानी, विचारवंत आणि तेजस्वी महापुरुष होते.
त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते.
त्यांच्या लहानपणीचे नाव नरेंद्र नाथ असे होते. लहानपणापासून त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. त्यांना व्यायाम, कुस्ती, पोहणे, गायन, वादन, घोडेस्वारी इ. छंद होते.
स्वामी विवेकानंद यांचे रामकृष्ण परमहंस हे गुरू होते. गुरूंच्या भेटी-नंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला गती मिळाली. रामकृष्ण परमहंस यांना ज्ञात असलेले सत्य व हिंदूधर्म जगभर पोहोचवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांचे वक्तृत्व प्रभावी होते. ११ सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्मपरिषद भरली होती. त्यावेळी स्वामीजींनी ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे म्हणून भाषणाची सुरुवात करताच तेथे जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
स्वामी विवेकानंद यांनी इ.स. १८९७ मध्ये ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. त्यांनी खूप कमी वेळेत वेद आणि योग यांचा प्रचार जगभर केला. त्यांच्या मते, हिंदू धर्म म्हणजे फक्त पारंपारिक ग्रंथ नसून आखिल मानव जातीने अनुभवलेले आध्यात्मिक परमोच्च शिखर आहे.
स्वामी विवेकानंद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान आहे. त्यांनी तरुणांना विशेष मार्गदर्शन केले. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.’ असा महान संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिला.
दुर्देवाने, ४ जुलै १९०२ रोजी हे युगपुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी स्वामी विवेकानंद अनंतात विलीन झाले.
Read More :-
संक्षेप में
स्वामी विवेकानंद मराठी भाषण (Swami Vivekananda Speech in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट में हमें जरूर बताएं और इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा !