तुम्ही स्वातंत्र्य दिन निबंध मराठी (Swatantra Din Nibandh Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला 15 ऑगस्ट निबंध सांगितले आहे. तर जाणून घेऊया
1) 15 ऑगस्ट निबंध मराठी – 15 August Nibandh Marathi
15 ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाला आपण स्वातंत्र्य दिन असेही म्हणतो. 15 ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तेंव्हापासून आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर वीरांनी मोलाचे योगदान दिले. या दिवशी आपण त्या सर्व शूर वीरांना नमन करतो. 15 ऑगस्ट या दिवशी देशभर उत्साहाचे वातावरण असते.
या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. सर्व शाळा, कॉलेज मध्ये झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते राष्ट्रगीत, झेंडागीत गायले जाते. गोड खाऊ वाटप केले जाते. हा दिवस आपल्याला बंधुभाव आणि एकतेचा संदेश देतो. आपल्या मनात देशप्रेम वाढवतो.
2) स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Swatantra Din Marathi Nibandh 2023

१५ ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्या- साठी महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग सुखदेव, राजगुरू यासारख्या अनेक शर स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले.
इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराला कंटाळून भारतीय संघटित झाले. त्यांनी एकत्र येऊन बंड पुकारले.अनेक उठाव, सत्याग्रह, आंदोलने करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
अखेर, १५ ऑगस्ट १९४७ रोजी अनेक शूरवीरांच्या प्राक्रमातून तसेच बलिदानातून भारत देश स्वतंत्र झाला. या दिवसाची आठवण तसेच आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस देशभर उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. देशातील सर्व शाळा – महाविद्यालये, कार्यालये इ. ठिकाणी ध्वजवंदन केले जाते. देशभक्तीपर गीते गायली जातात. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. विविधतेत एकता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने क्रीडा, कला, आर्थिक, सामाजिक तसेच साहित्यिक क्षेत्रात प्रगती केली आहे.
तरीही अजून भ्रष्टाचार, गरीबी, अशिक्षितपणा अशा काही समस्या देशात दिसून येतात. आपण सर्व संघटित होऊन त्यांचे निराकरण करूया. आपल्या भारताचे नाव जगात उज्ज्वल करूया.
Read More :-
स्वातंत्र्य दिन निबंध (15 August Essay in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.