Teachers Day Essay in Marathi :- भारताला प्राचीन काळापासून गुरूंची भूमी म्हटले जाते. शिक्षक हे कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य निर्माते मानले जातात कारण ते आपल्याला लहानपणापासूनच योग्य दिशा दाखवतात.
शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तुम्हाला शिक्षक दिनी मराठी निबंध लिहायचा आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. चला तर मग जाणून घेऊया सर्वोत्तम निबंध.
1) शिक्षक दिनानिमित्त 10 वाक्यांचा निबंध – Shikshak Diwas Par Nibandh
- दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून आनंदाने साजरा करतो.
- या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन असतो.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
- हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्मरण व्हावे तसेच आपले भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून साजरा केला जातो.
- प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे.
- शिक्षक हे आपले मित्र, मार्गदर्शक व प्रेरक असतात.
- ते आपल्यावर उत्तम संस्कार करतात.
- ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात.
- ते आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर जीवन कसे जगावे हे सुध्दा शिकवतात.
- आपण नेहमी आपल्या शिक्षकांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे व त्यांचा आदर व सन्मान केला.
2) शिक्षक दिन निबंध मराठी – Teachers Day Essay in Marathi

दरवर्षी भारतात ५ सप्टेंबरला शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. ते एक महान विद्वान तसेच आदर्श शिक्षक होते.
आपल्या जीवनात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिक्षक आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात. ते आपल्या जीवनाला योग्य आकार देतात. शिक्षक आपले मार्गदर्शक आणि प्रेरक असतात.
शिक्षक दिन हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस आहे. हा दिवस सर्व शाळा तसेच कॉलेजमध्ये साजरा केला जातो. विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी या दिवशी शिक्षकांना भेटवस्तू तसेच ग्रीटींग कार्ड देतात.
शिक्षक दिन हा सर्व शिक्षकांसाठी एक विशेष दिन आहे. शिक्षक हे निस्वार्थीपणे समाजाची सेवा करीत असतात. या महान दिनी आपण त्यांना वंदन करूया. त्यांचा नेहमी आदर करूया.
Read More :-
3) शिक्षक दिन निबंध मराठी – Shikshak Diwas Par Nibandh in Marathi

गुरुविण न मिळे ज्ञान
ज्ञानाविण न होई जगी सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदू गुरुराया…
शिक्षक दिन हा सर्वांसाठी विशेषतः शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रसंग आहे.दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता. ते कुशल वक्ते, थोर विचारवंत, विद्वान उत्तम लेखक व आदर्श शिक्षक होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक म्हणजे
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती..
शिक्षक म्हणजे
चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार
जो करतो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार…..
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्यांचा आनंद साजरा करण्यासाठी शिक्षक दिन हा अद्भुत प्रसंग आहे. शिक्षक दिन आपल्या समाजात इतर व्यवसायांप्रमाणे शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. शिक्षक दिन आपल्या शिक्षकांच्या प्रयत्नांना आणि कार्याला श्रद्धांजली म्हणून देखील साजरा केला जातो.
शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते अतूट असते. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता असतो. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो.
शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत. शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्या सद्गुणांचा विकास घडवून आणतात.
भारतात प्राचीन काळापासूनच गुरु-शिष्य परंपरा असून शिक्षक हे आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात म्हणूनच म्हटले आहे “गुरु विना कोण दाखवील वाट”
राष्ट्रनिर्मितीचा मूळ पाया घालणारी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक. जीवन जगताना कितीतरी प्रसंग येतात त्यातून निघण्याचे सामर्थ बालपणी शिक्षकांनी शिकवलेले संचितच पुरविते आणि बळ देते. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त विषयाचे ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याचे बाळकडू पाजतात.
संपूर्ण भारतातील शाळांमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या आवडत्या शिक्षकांप्रमाणे कपडे घालून खालच्या वर्गात हजेरी लावतात. मुलांना वेगवेगळे वर्ग दिले जातात जिथे ते जाऊन शिकवतात.
लहान मोठ्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. यादरम्यान शाळेची शिस्त कायम राहील याची काळजी वरिष्ठ विद्यार्थी घेतात आणि त्यासाठी कनिष्ठ विद्यार्थी त्यांना साथ देतात. या दिवशी अनेक कार्यक्रम आणि स्पर्धांसोबतच सर्वोत्कृष्ट ड्रेस आणि रोल प्ले सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षक दिनी शिक्षक वर्गात आराम करून सर्व क्रियाकलपांचा आनंद घेतात.
आधुनिक काळात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षक दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. या दिवशी विद्यार्थी खूप आनंदी असतात आणि त्यांच्या आवडत्या शिक्षकांचे त्यांच्या पद्धतीने अभिनंदन देखील करतात.
काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांना पेन, ग्रीटिंग कार्ड इत्यादी देऊन त्यांचा आनंद साजरा करतात. काहीजण ऑडिओ, मेसेज, ईमेलने लिखित संदेश किंवा फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग वरून शिक्षकांचे अभिनंदन करतात.
आज काही शिक्षकांनी आपल्या ज्ञानाची बोली लावली आहे. सध्याच्या युगात गुरु-शिष्य परंपरा कुठेतरी कलंकित होत आहे. शिक्षकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल आपण रोजच ऐकतो हे पाहून आपल्या संस्कृतीच्या या अनमोल गुरु-शिष्य परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
या महान परंपरेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन एक चांगला समाज घडवण्यासाठी आपले सहकार्य देणे ही विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचीही जबाबदारी आहे.
शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची सुशिक्षित पिढी घडवणाऱ्या तसेच अज्ञानावर घाव घालून विद्यार्थ्यांना स्वयंप्रकाशित करणाऱ्या माझ्या जीवनातील सर्व गुरुवर्यांना शिक्षक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
Read More :-
शिक्षक दिन निबंध मराठी (Teachers Day Essay in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.