Marathi Speech

5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी

Teachers Day Speech in Marathi :- शिक्षण हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपले शिक्षक हेच आपल्याला शिक्षणाचा धडा शिकवतात.

विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी शिक्षक कठोर परिश्रम घेतात. त्यांच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा गौरव करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.

या पोस्टमध्ये, मी तुम्हाला शिक्षक दिनी मराठी भाषण सांगितले आहे, जे सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे, चला वेळ न घालवता वाचूया.

1) शिक्षक दिन १० ओळी सोप्या भाषण – Shikshak Din Bhashan Marathi

गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णु, गुरूदेवो महेश्वराः
गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः

  1. माझे नाव …….. आहे.
  2. आज ५ सप्टेंबर ! म्हणजे शिक्षक दिन, तर प्रथम सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
  3. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो.
  4. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, ते कुशल वक्ते, थोर विचारवंत, लेखक व आदर्श शिक्षक होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  5. ते आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपत्ती होते, त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले..
  6. शिक्षक हा तीन अक्षरी शब्द आहे, पण या शब्दात एवढी प्रचंड शक्ती आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्या चे जीवन बदलून जाते.
  7. शिक्षक हे भावी पिढी संस्कारक्षम घडवण्याचे कार्य करतात व ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर ते आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवतात.
  8. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडके तयार करतो, त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात त्यांच्या भविष्याला आकार देतात.
  9. शिक्षकांचे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. ते आपले खरे मार्गदर्शक, चांगले मित्र व प्रेरक असतात व ते आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत.
  10. हा दिन आपल्याला संस्कारक्षम बनवलेल्या महान शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस अहि या दिनी आपण गुरूंना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्याचा प्रयत्न करूया.

Read This :- शिक्षक दिन निबंध मराठी

2) शिक्षक दिन भाषण मराठी – Teachers Day Speech in Marathi

Teachers Day Speech in Marathi

गुरुविना ना मिळे ज्ञान….
ज्ञानाविना ना मिळे सन्मान !
गुरु आहेत प्रेमाची छाया….
चला नमन करू ‘गुरुराया’ !

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो…. सर्वांना माझा नमस्कार !

सर्वप्रथम, आपल्या देशाचे भविष्य घडवणाच्या सर्व शिक्षकांना माझे कोटी-कोटी प्रणाम….

आज ५ सप्टेंबर, हा दिवस आपण ‘शिक्षक दिवस’ म्हणून मोठया उत्साहात साजरा करीत आहोत. ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. आजचा हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.

ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतात, त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विदयार्थ्याच्या भविष्याला आकार देतात. शिक्षक आपल्या विदयार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचे भविष्य घडवतात. किवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे देखील ज्ञान ते देतात.

शिक्षकांना समाजाचा ‘पाठीचा कणा’ म्हटले जाते. विदयार्थ्यांचे चरित्र निर्माण करून त्याला देशाचा एक आदर्श नागरिक बनवण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. शिक्षक आपले मित्र, मार्गदर्शक व प्रेरक असतात.

असे म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विदयार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात. आजचा हा दिवस आपले भविष्य उज्ज्वल व यशस्वी करणाऱ्या शिक्षकांना वंदन करण्याचा आहे. आपण नेहमी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे.

ज्ञानाचा प्रकाश देण्या….
दिवा अखंड तो जळतो !
जीवनाचा अर्थ खरा….
शिक्षकांमुळेच कळतो !!

धन्यवाद !

Read More :-

3) शिक्षक दिन मराठी भाषण – 5 September Bhashan

गुरुविना ना मिळे ज्ञान,
ज्ञानाविना ना मिळे सन्मान …..
जीवन भवसागर तराया,
चला वंदूया गुरूराया …

सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार !

विदयार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरूजनांना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम !

आज ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस, दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.

असे म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक हे विदयार्थ्यांला ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतात; त्याप्रमाणे शिक्षक आपल्याला विदयार्थ्याला घडवतात. त्याच्या भविष्याला आकार देतात.

शिक्षक दिन हा देशाच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते, शिक्षकांमुळेच देशाचे भावी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, लेखक, वकील, खेळाडू तसेच इतर क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते, शिक्षक हा जितका कर्तव्यदक्ष, कुशल आणि हुशार असेल तितका देशाचा विकास झपाटयाने होत असतो.

शिक्षक दिन हा आपल्याला संस्कारक्षम बनवलेल्या महान शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस आहे. या दिनी आपण गुरूंना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्याचा प्रयत्न करूया. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद !
जय हिंद, जय भारत !

Read This :-

शिक्षक दिन भाषण मराठी (Teachers Day Speech in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

यह पोस्ट कितनी उपयोगी थी ?

Average rating / 5. Vote count:

अब तक कोई वोट नहीं, इस पोस्ट को रेट करने वाले पहले व्यक्ति बनें

MDS Thanks 😃

पोस्ट अच्छी लगी तो सोशल मीडिया पर हमें फॉलो करें

हमें खेद है कि यह पोस्ट आपके लिए उपयोगी नहीं थी !

हमें बताएं कि हम इस पोस्ट को कैसे बेहतर बना सकते हैं ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Please allow ads on our site !

Looks like you're using an ad blocker. We rely on advertising to help fund our site.