क्या आप विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध (Vidnyan Shap ki Vardan Marathi Nibandh) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको विज्ञान शाप की वरदान सोपे निबंध बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
विज्ञान शाप की वरदान – Vidnyan Shap ki Vardan Marathi Nibandh

विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सरल झाले आहे. विज्ञानाने आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विज्ञानामुळे मानवी कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. पण विज्ञानाने जेवढ्या सुखसुविधा दिल्या आहेत तेवढेच याचे दुष्परिणाम ही जगाला भोगावे लागतात.
विज्ञानाला वरदानांच्या रूपाने पाहिले तर त्याने मानवी कल्याणासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली कामे विज्ञानानेच संचलित होतात. विजेचा शोध विज्ञानातील महत्त्वाचा शोध आहे.
आज रेल्वे, विमान, बस, मोटरसायकल इ. साधनांमुळे मनुष्य काही तासातच एका जागेहून दुसऱ्या जागेवर पोहचू शकतो. एवढेच नव्हे तर तर अंतराळ यान च्या मदतीने मनुष्य हतर ग्रहांवरही पोहचला आहे.
विज्ञानामुळे आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल इ. संसाधनांचा उपयोग करून माहिती काही क्षणातच एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहचवली जाते. याशिवाय शेती, औद्योगिक, शिक्षा व मनोरंजनाच्या क्षेत्रातही विज्ञानाचे फार महत्वा आहे.
ज्याप्रमाणे विज्ञानाचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. विज्ञानाचा वापर नियंत्रित व नियोजित नसल्याने मानसाचे मानसिक संतुलन बिघडत आहे. सर्व सुविधा आल्याने शारीरिक कामे कमी झाली त्यामुळे शरीर कमजोर होत चालले आहे.
गाडी व तंत्रज्ञान वापरामुळे प्रदूषण वाढत आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. विज्ञान शाप की वरदान या दोनी बाजू बरोबर आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे म्हणजे संभाव्य नुकसानाला आमंत्रण देण्यासारखे असते. विज्ञानाचा सुयोग्य वापर लाभदायक ठरेल.
Read More :-
विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध (Vidnyan Shap ki Vardan Marathi Nibandh) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये निबंध अच्छा लगा तो इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.