26 जानेवारी 2023 साठी सोपे आणि छोटे भाषण

विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे ... भारत देश महान !

सर्वांना नमस्कार !  माझे नाव ...... आहे. आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत.

सर्वप्रथम, तुम्हां सर्वांना “भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे.

२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत.

प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला ऐक्यतेची व बंधुभावाची शिकवण देतो.

या मंगलदिनी आपण आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्याचा संकल्प करूया.

जय हिंद। धन्यवादं ।